CM शिंदे आमदार जोरगेवारांना रात्री दोन वाजता भेटले अन् प्रश्नही मार्गी लावले…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री केवळ दोन ते तीन तास झोपतात, असे व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे. असे मत काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले होते. त्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि केसरकर यांची बरीच खिल्ली उडविण्यात आली. सोशल मिडीयावरही दोघे चांगलेच ट्रोल झाले होते. मात्र शिंदे […]
ADVERTISEMENT

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री केवळ दोन ते तीन तास झोपतात, असे व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे. असे मत काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले होते. त्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि केसरकर यांची बरीच खिल्ली उडविण्यात आली. सोशल मिडीयावरही दोघे चांगलेच ट्रोल झाले होते.
मात्र शिंदे यांच्या याच सवयीचा प्रत्यय काल चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयाकरिता त्यांना चक्क रात्री दोन वाजताची वेळ दिली. तसेच त्यांचे बऱ्यापैकी प्रश्नही मार्गी लावण्यात आले, तर काही मार्गी लावण्यात येतील असे आश्वासनही जोरगेवार यांना मिळाले.
“अगली बार चुन चुन के मारे जायेंगे” : राड्यानंतर आमदार गायकवाड यांचा ठाकरे गटाला इशारा
नेमके काय झाले..?
आमदार किशोर जोरगेवार मतदारसंघातील विविध कामांसाठी मुंबई दौऱ्यावर आहे. यातील अनेक कामे मुख्यमंत्री शिंदे यांच्या विभागाशी संबंधित होती. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचा वेळ मागितला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिवसभर व्यस्त कार्यक्रम असल्याने जोरगेवार यांना त्यांची भेट घेता आली नाही.