Taliye landslide: दु:खाचा डोंगर कोसळलेल्या तळीये गावाला CM Thackeray देणार भेट, घटनास्थळाचा घेणार आढावा

मुस्तफा शेख

मुंबई: महाड तालुक्यातील तळीये गावात शुक्रवारी दरड कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 40 हून अधिक नागरिक ठार झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेमुळे तळीये गावातील संपूर्ण वाडीच नष्ट झाली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आता याच दुर्घटना झालेल्या तळीये गावी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: महाड तालुक्यातील तळीये गावात शुक्रवारी दरड कोसळून एक मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल 40 हून अधिक नागरिक ठार झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेमुळे तळीये गावातील संपूर्ण वाडीच नष्ट झाली आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आता याच दुर्घटना झालेल्या तळीये गावी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेट देणार असल्याची माहिती समजते आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 24 जुलै रोजी दुपारी मुंबईतून महाडच्या दिशेने रवाना होणार आहेत. यावेळी ते हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील पूर स्थितीची आढावा घेणार आहेत. यानंतर मुख्यमंत्री महाडमधील तळीये या गावी जाणार असून दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन एकूण परिस्थिती जाणून घेणार आहेत.

तळीये गावी दुर्घटना झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे पोहचले होते. दरम्यान, या घटनेनंतर त्यांनी राज्य सरकारवर बरीच टीका केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्वत: मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, याआधीच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली होती.

हे वाचलं का?