चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीत येणार असल्याचं ऐकलं: उद्धव ठाकरे
औरंगाबाद: ‘माजी मंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. दोन-तीन दिवसात काय ते कळेल.’ असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फोडलं. चंद्रकांत पाटलांच्या विधानाने राज्यात पुन्हा सत्तासमीकरण बदलणार का? अशी चर्चा रंगलेली असताना औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनीही ‘भावी सहकारी’ असं म्हणत भाजपला खुणावलं. पण याच वेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद: ‘माजी मंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. दोन-तीन दिवसात काय ते कळेल.’ असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला तोंड फोडलं. चंद्रकांत पाटलांच्या विधानाने राज्यात पुन्हा सत्तासमीकरण बदलणार का? अशी चर्चा रंगलेली असताना औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांनीही ‘भावी सहकारी’ असं म्हणत भाजपला खुणावलं. पण याच वेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या एका वक्तव्याने चंद्रकांत पाटलांची विकेट काढली आहे.
चंद्रकांत पाटलांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?
पुण्यातील एका कार्यक्रमाचं उद्घाटन हे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सूत्रसंचालक सतत चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख माजी मंत्री असाच करत होता. जेव्हा चंद्रकांत पाटील हे फित कापण्यासाठी आले तेव्हा ते त्या व्यक्तीला उद्देशून म्हणाले की, ‘माजी मंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. दोन-तीन दिवसात काय ते कळेल.’
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्यावरुन शिवसेना-भाजप एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली.









