Shiv Sena MLA: ‘मातोश्री’ला बदनाम करणाऱ्या आमदाराला उद्धव ठाकरेंनी तात्काळ पक्षातून बडतर्फ करावं’
बुलडाणा: ‘विधिमंडळ सदस्यच जर कायद्याची पायमल्ली करत असतील तर त्यांना एक क्षण सुद्धा विधिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्याचबरोबर ‘मातोश्री’ला आणि शिवसेना पक्षाला बदनाम करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ आपल्या पक्षातून निलंबित करावे.’ अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. खामगाव तालुक्यातील अंबिकापूर तेथील कुटुंबाला भेट […]
ADVERTISEMENT
बुलडाणा: ‘विधिमंडळ सदस्यच जर कायद्याची पायमल्ली करत असतील तर त्यांना एक क्षण सुद्धा विधिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्याचबरोबर ‘मातोश्री’ला आणि शिवसेना पक्षाला बदनाम करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ आपल्या पक्षातून निलंबित करावे.’ अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
खामगाव तालुक्यातील अंबिकापूर तेथील कुटुंबाला भेट देण्यासाठी शनिवारी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे बुलडाणा जिल्ह्यात आले असता खामगावमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार संजय गायकवाड यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा निषेध करत पक्षाला बदनाम करणारे आमदार उद्धव ठाकरे यांना पक्षात पाहिजेत का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांच्या माध्यमातून विचारला आहे.
हे वाचलं का?
आमदार संजय गायकवाड यांनी नेमकं कोणतं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं?
ADVERTISEMENT
सत्ताधारी पक्षाच्या शिवसेना आमदाराने एक धक्कादायक वक्तव्य केल्याचं व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड हे चिथावणीखोर भाष्य करीत असल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT
व्हीडिओमध्ये ते असं म्हणत आहेत की, ‘जर तुमच्यावर कोणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवित असेल तर तुम्ही देखील त्याच्यावर दरोडयाचा गुन्हा नोंदवा. पुढे ते असंही म्हणाले की, गरज भासल्यास अस्त्र-शस्त्र मी पुरवितो. गरज पडली तर 10 हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन मी तुमच्या पाठीशी उभा राहीन.’
त्यांच्या याच वक्तव्याचा निषेध जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकावं अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी याआधीही देवेंद्र फडणवीसांबाबतही केलं होतं वादग्रस्त वक्तव्य:
कोरोनाच्या दुसर्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा जो तुटवडा सुरु होता त्यावरुन संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती.
’50 हजार इंजेक्शनं ते गुजरातमध्ये भाजपच्या कार्यालयातून फुकट वाटतात. इकडे मात्र महाराष्ट्रात लोकं तडफडत आहेत. अशा प्रकारचं खालच्या दर्जाचं राजकारण देशामध्ये, जगामध्ये कोणत्याच पक्षाने केलेलं नाही. जे याठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीस यांची लोकं करत आहेत.’
‘कोरोनाचे जंतू मिळाले तर मी फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते’, शिवसेना आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
‘आज त्यांना बांगलादेशला द्यायला व्हॅक्सिन आहे, पाकिस्तानतला द्यायला व्हॅक्सिन आहे. महाराष्ट्र काय पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा गयागुजरा आहे का? ही राजकारण करायची वेळ आहे का? अशावेळेला राजकारण करणाऱ्या मोदी सरकारला लाज वाटली पाहिजे.’
‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते. इतका तिकरस्कार या लोकांबद्दल तयार झालेला आहे. यांन राजकारण न करता लोकांना मदत केली पाहिजे. पहिले आमचा महाराष्ट्र जगला पाहिजे. मग तुमचं राजकारण.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT