काँग्रेसचे ‘ते’ सात आमदार अडचणीत?; पृथ्वीराज चव्हाणांच्या मागणीनंतर ११ नेत्यांना नोटीस

मुंबई तक

शिवसेनेतील बंड आणि सत्तांतरामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसमधील आमदारांचा विषय मागे पडला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षश्रेष्ठीने कारवाईच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे. काँग्रेसने ११ आमदारांना कारणे द्या नोटीस बजावली आहे. जूनमध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित असताना काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांमध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेतील बंड आणि सत्तांतरामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसमधील आमदारांचा विषय मागे पडला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षश्रेष्ठीने कारवाईच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आहे. काँग्रेसने ११ आमदारांना कारणे द्या नोटीस बजावली आहे.

जूनमध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित असताना काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली. यात काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झाले. निवडणूक निकालानंतर काँग्रेसची ७ मतं फुटल्याचं समोर आलं. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील काही नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली होती.

“उद्धव ठाकरेंनी हे आधीच सांगितलं असतं, तर बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी होती”

दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाल्याने काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या क्रॉस व्होटिंगचा मुद्दा चर्चेच्या परिघातून बाहेर पडला होता. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांचं या मुद्द्याकडे लक्ष वेधलं. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ७ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर असणाऱ्या आमदारांबद्दलही नाराजी व्यक्त केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp