अजित पवारांनंतर नाना पटोलेंनीही सरकारला धरले धारेवर; असंवैधानिक सरकार म्हणत केली टीका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पूरग्रस्त भागाची शनिवारी पाहणी केली. राजुरा तालुक्यातील पूरबुडीत शेतशिवारांना भेटी देत त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. रस्ता चिखलाचा असल्याचे पाहून पटोलेआणि अन्य नेत्यांनी बैलगाडीतून काही भागांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी पाहणी करत लवकर मदत मिळत नसल्याने राज्य सरकारवर टीका केली. सध्या राज्यात अस्तित्वात असलेलं दोन लोकांचं सरकार हे […]
ADVERTISEMENT
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पूरग्रस्त भागाची शनिवारी पाहणी केली. राजुरा तालुक्यातील पूरबुडीत शेतशिवारांना भेटी देत त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. रस्ता चिखलाचा असल्याचे पाहून पटोलेआणि अन्य नेत्यांनी बैलगाडीतून काही भागांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी पाहणी करत लवकर मदत मिळत नसल्याने राज्य सरकारवर टीका केली. सध्या राज्यात अस्तित्वात असलेलं दोन लोकांचं सरकार हे असंवैधानिक आहे, असं नाना पटोले म्हणाले.
ADVERTISEMENT
अतिवृष्टीवरती काय म्हणाले नाना पटोले?
मागील काही दिवसात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, नांदेड आणिबीड या विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे घरं पडली असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीसह जनावरे देखील दगावली आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात आल्याने काही भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे प्रमुख नेते पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी नांदेड आणि बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी देखील चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात जाऊन पाहणी केली. यादरम्यान राज्यात साडेदहा लाख हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती नानांनी दिली.
हे वाचलं का?
हे सांगत असताना नानांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यातील दोन लोकांचे असंवैधानिक सरकार स्वतःच्या मस्तीत असून अद्याप शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई नाहीच, यावरत्यांनी टीका केली. चंद्रपूर जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यासंदर्भात बोलताना सत्तेच्या उन्मादात असलेल्या या सरकारला लोकशाही पद्धतीने घरी पाठवू, आत्महत्या करू नका, असे आवाहन नानांनी केले.
नाना पटोले यांच्या आधी अजित पवारांनी सुद्धा शिंदे आणि फडणवीस सरकारला घेरले. नांदेड जिल्ह्यातील माहूरतालुक्यात नुकसानाची पाहणी करायला गेलेल्या अजित दादांनी सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले. आपण राज्याचे मुख्यमंत्री झालात, पण तुम्ही सगळीकडे फिरत आहात. तो तुमचा अधिकार आहे पण, त्या आधी संकटात असलेल्यालोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करा ना! त्यांना आत्मविश्वास द्या, असा सल्ला अजित पवारांनी दिला. मात्र 15 दिवस झाले तरी संकटातून बाहेर काढू, असं म्हणतात. पण अजून पंचनामे नाही. नुसतेच इकडे-तिकडे फेऱ्या आणि दौरे सुरुआहेत. तुमचे दौरे महत्वाचे आहेत की माणसांचे जीव, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT