मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरणाला काँग्रेसचा विरोध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तक: मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण असावे या मुंबई महापालिकेच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध केला आहे. राज्यात मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस पक्षानेच त्यांच्या मित्रपक्षांच्या या भूमिकेला विरोध केला आहे.

ADVERTISEMENT

मुंबईच्या अर्थसंकल्पात शहरातील इतर प्राधिकरणाऐवजी पालिकेकडून एकमेव नियोजन प्राधिकरणाचा सुरू असलेला घट चुकीचा असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या बजेटवरही टीका केली. पालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प हा शिलकी दाखवण्याच्या अनुषंगाने फुगवून दाखवल्याची टीका त्यांनी केली आहे. सादर करताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण करण्याबाबत अर्थसंकल्पातील उल्लेख वाचून दाखवला होता.

हे वाचलं का?

मुंबईमध्ये म्हाडा, एसआरए, एमसआरडीसी, एमएमआरडीए, एमआयडीसी ही प्राधिकरणं आहेत ज्या माध्यमातून मुंबईत विकासाची काम करण्यात येतात. या प्राधिकरणांना विकासाची काम करताना लागणाऱ्या मुलभूत सुविधांचा पुरवठा पालिका करते. याचाच आधार घेत मुंबई महापालिकेने एकाच छताखाली सर्व परवानग्या देण्याचा अधिकार मुंबई महापालिकेला मिळाल्यास त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होईल असं कारण देत मुंबई हे एकमेव नियोजन प्राधिकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे कारण दिले आहे.

याआधी मुंबई महापालिकेत दोन आयुक्त असावेत अशी मागणी काँग्रेने केली होती. काँग्रेसचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दोन आयुक्त असावेत ही मागणी लावून धरली होती. तर, शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी एकच आयुक्त असावा असं मत मांडलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT