NCP ने भाजपला पकडलं जाळ्यात, आता फडणवीस काय करणार?
Prasad Lad vs NCP: मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) सातत्याने केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याने भाजपची (BJP) अडचण वाढलेली असताना त्यात आता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या वक्तव्याने वादाला नवी फोडणी मिळाली आहे. (controversial statements of bjp leaders regarding shivaji maharaj ncp caught bjp in a trap what will fadnavis […]
ADVERTISEMENT

Prasad Lad vs NCP: मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) सातत्याने केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याने भाजपची (BJP) अडचण वाढलेली असताना त्यात आता भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या वक्तव्याने वादाला नवी फोडणी मिळाली आहे. (controversial statements of bjp leaders regarding shivaji maharaj ncp caught bjp in a trap what will fadnavis do now)
प्रसाद लाड म्हणतात, शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला..
‘स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी असं तुम्ही विचाराल.. तर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराजांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं आणि रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरुवात कोकणातून झाली.’ असा चुकीचा इतिहास प्रसाद लाड यांनी सांगितला.
ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने लागलीच हा मुद्दा पकडला. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत असं म्हटलं की, ‘भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.’
‘शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. त्यांच्या चुका उपस्थित पत्रकार सुधारत आहेत. ही खूप लाजिरवाणी बाब आहे.’ असा टोला हाणत राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला.