Satara : छत्रपती उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये राजकीय धुळवड : चित्रावरुन पेटला वाद
Chhatrapati Udyanraje Bhosale Painting Controversy : सातारा : होळी आणि धुलवडीमध्ये साताऱ्यात राजकीय धुळवड रंगली आहे. भाजप (BJP) खासदार उदयनराजे (Chhatrapati Udyanraje Bhosale) यांच्या भिंतीचित्रावरुन हा वाद रंगला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांना त्यांचं चित्र काढायचं आहे. यालाच शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) […]
ADVERTISEMENT

Chhatrapati Udyanraje Bhosale Painting Controversy :
सातारा : होळी आणि धुलवडीमध्ये साताऱ्यात राजकीय धुळवड रंगली आहे. भाजप (BJP) खासदार उदयनराजे (Chhatrapati Udyanraje Bhosale) यांच्या भिंतीचित्रावरुन हा वाद रंगला आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या शेजारी असलेल्या इमारतीवर उदयनराजेंच्या समर्थकांना त्यांचं चित्र काढायचं आहे. यालाच शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांचा विरोध आहे.
पालकमंत्री देसाई आणि उदयनराजे समर्थक यांनी सामोपचाराने हा विषय मिटवला असल्याचं सांगितलं जात आहे. तर याबाबत बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, खासदारांच्या पेंटिंगचा वाद महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि काश्मिरच्या वादापेक्षाही गहण आहे. मुळात खासदारांचे पेंटिंग कुठे काढायचे याबाबत राज्यसभा निर्णय देईल, हा सर्व बालिशपणाचा कळस आहे. यातून काय साध्य होणार आहे, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी उदयनराजे यांच्या पेंटिंगच्या विषयाची खिल्ली उडवली.
ना कोहली ना सूर्यकुमार… एबी डिव्हिलियर्स म्हणतो, ‘हा’आहे T20तला सर्वात बेस्ट खेळाडू