Mumbai Bank Election: भाजपच्या प्रविण दरेकरांना सहकार विभागाकडून नोटीस, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई बँक निवडणूक प्रकरणी प्रविण दरेकरांना यांना सहकार विभागाने नोटीस बजावल्याचं समोर आलं आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबई बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थेच्या अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे. मात्र दरेकर मजूर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर सहकार विभागाकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आधीही मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे यावेळी देखील त्यांनी मजूर संस्थेमार्फत मुंबई बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.

प्रविण दरेकर यांना सहकार विभागाने जी नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांना आपण मजूर आहात की नाही? असा थेट सवाल विचारण्यात आला आहे. यावेळी त प्रविण दरेकर यांना 21 डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2 जानेवारी 2022 रोजी मुंबई बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. यासाठी प्रसाद लाड, प्रविण दरेकर यांच्यासारखी मातब्बर मंडळी या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. सध्या तरी दरेकर आणि लाड यांच्याविरोधात कोणताही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. तरी दरेकरांना मिळालेली नोटीस ही त्यांच्यासाठी अडचणीची ठरु शकते.

‘त्या’ नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?

ADVERTISEMENT

मजूर म्हणजे प्रत्यक्ष अंग मेहनतीचे व शारीरिक श्रमाची कामे करणारी व्यक्ती असते. ज्याचे उपजीविकेचे प्रमुख साधन हे मजुरीवर अवलंबून असते. फक्त अल्प व अत्यल्प भूधारक व्यक्ती अंगमेहनतीची कामं करतो.

ADVERTISEMENT

ती व्यक्ती कोणत्याही प्रकारचे बांधकामाचे कंत्राट घेत नाही. तसेच बांधकाम साहित्य वाहतुकीचे कंत्राट घेत नाही.

आपण विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख रुपये एवढी असल्याचे दाखवलं आहे. तर स्वतःची स्थावर मालमत्ता ही 90 लाख रुपये असल्याचे दाखवले आहे.

तसेच विधान परिषद सदस्य म्हणून आपणास 2 लाख 50 हजार एवढं मासिक मानधन आणि भत्ता मिळत असल्याचे देखील दिसून येते. त्यामुळे सकृतदर्शनी आपण मजूर नसल्याचे दिसून येत आहे. असं सहकार विभागाने नोटीसमध्ये म्हटले आहे.

ज्याअर्थी मजूर सहकारी संस्थेच्या उपविधीमधील प्रकरण 2 नियम 9 मधील अटीनुसार, ‘मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारीरिक श्रमाचे कामे करणारी व्यक्ती असून जिचे उपजिविकेचे प्रमुख साधन मजूरीवर अवलंबून असेल तसेच तो शारीरिक श्रमातून मजूरी करणाला असला पाहिजे’ अशी तरतूद असून आपण महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्नाचे साधन ‘स्वतंत्र व्यवसाय’ असे नमूद केलेले आहे.

Mumbai Bank Scam : विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांना हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा

या सगळ्याबाबत आता प्रविण दरेकर यांना 21 डिसेंबर 2021 पर्यंत आपलं म्हणणं लेखी किंवा प्रत्यक्षपणे हजर राहून विभागीय सहनिबंधक कार्यालयात मांडावं लागणार आहे. जर दरेकरांनी या नोटीसला काही उत्तर न दिल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT