कोरोना फोफावतोय! महाराष्ट्र ‘टास्क फोर्स’ने मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली चिंता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्या दररोज वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीनंतर टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे काही सूचना केल्या आहेत.

ADVERTISEMENT

दिल्ली, कर्नाटक तसेच इतर काही राज्यांमध्ये कोविड संसर्गात वाढ होत असून त्याविषयी महाराष्ट्रातील राज्य टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी टास्क फोर्स सदस्यांनी त्यांची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानी घातली. मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक आहे असं टास्क फोर्सचं म्हणणं आहे. मंगळवारी या टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या सूचना सांगितल्या. डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी तसेच इतर सदस्य बैठकीत होते.

Booster dose : तुम्हीही बुस्टर डोस घ्यायला टाळाटाळ करताय?, मग ही माहिती वाचा

हे वाचलं का?

पुन्हा एकदा मास्क सक्ती?

मास्कचा वापर आवश्यकच असून, किमान बंदिस्त ठिकाणी मास्क घालनं बंधनकारक करावं, असं टास्क फोर्स सदस्यांचं म्हणणं आहे. विशेषतः चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेता या ठिकाणी सर्वांनी मास्क घालणं बंधनकारक असलं पाहिजे, असं मत या सदस्यांनी व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

विमान कंपन्या प्रवाशांना मास्क घालत राहण्याविषयी वारंवार सांगतात, तशाच पद्धतीने रुग्णालये, मग ती खासगी असो किंवा सार्वजनिक, याठिकाणी देखील तातडीनं मास्कचा वापर प्राधान्यानं सुरू करण्याविषयी सूचना देणं आवश्यक आहे. राज्यात कोविड चाचण्या म्हणाव्या तशा होत नाहीयेत, यावर देखील सदस्यांनी चिंता व्यक्त करून चाचण्याची संख्या वाढविण्यावर भर देण्यास सुचवलं आहे.

ADVERTISEMENT

Booster Dose : तुम्हालाही बुस्टर डोस घ्यायचाय?; मग समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सध्या संसर्ग झालेली व्यक्ती ही रॅपिड टेस्ट करून स्वतःला घरच्या घरीच घरच्या घरी उपचार करून घेत आहे आणि rt-pcr करणं टाळत आहे. त्यांना विलगीकरणातील आवश्यक उपचार घेणं गरजेचं आहे. मात्र तसे होताना दिसून येत नाही. भविष्यात विषाणूचे काही परिवर्तित (म्युटेशन) प्रकार येऊ शकतात त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, असं सदस्यांचं म्हणणं आहे.

सर्वच विषाणूचे प्रकार ओमिक्रॉन इतके सौम्य असतीलच, असे नाही. त्यामुळे मास्क घालणे व लसीकरण करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे असं टास्क फोर्स सदस्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोस घेण्यासाठी २७० दिवसांचं अंतर कमी करून १८० दिवसांवर आणावं, विषाणुचे उत्परिवर्तित प्रकार जाणून घेण्यासाठी व अधिक चांगली उपाययोजना करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंगचे निकाल वेळेवर मिळणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रयोगशाळाची संख्या वाढवावी, असं टास्क फोर्सने म्हटलेलं आहे.

बापरे! कोरोना परतला, दिल्ली-मुंबईत रूग्णवाढ; XE व्हेरिएंटविषयी डॉक्टरांचा ‘हा’ इशारा

बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कोविड आढावा बैठकीपूर्वी राज्याच्या टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्यासंदर्भातील निर्णयावर विचार करण्याची आवश्यकता असल्याचं मत टास्क फोर्सच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केलं आहे.

२४ तासांत आढळले ३००० रुग्ण

देशात रुग्णसंख्या वाढत असून, गेल्या २४ तासांत २,९२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याच कालावधीत देशभरात ३२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार २७९ वर पोहोचली आहे. सध्या देशातील कोरोना संसर्गाचा वेग ०.५८ टक्के असून, मागील २४ तासांच्या कालावधीत २,२५२ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT