आता दोन वर्षावरील मुलांवर देखील कोरोना लसीची होणार चाचणी, भारत बायोटेकला मंजुरी
नवी दिल्ली: भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. पण तज्ज्ञांनी लवकरच तिसरी देखील लाट येऊ शकते असा इशारा दिला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असल्याचं म्हटलं आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता एक मोठं पाऊल उचलण्यात येत आहे. कोरोना लसीशी निगडीत सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC)ने मंगळवारी भारत बायोटेकच्या […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. पण तज्ज्ञांनी लवकरच तिसरी देखील लाट येऊ शकते असा इशारा दिला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता असल्याचं म्हटलं आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता एक मोठं पाऊल उचलण्यात येत आहे.
कोरोना लसीशी निगडीत सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC)ने मंगळवारी भारत बायोटेकच्या 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हिसिनची चाचणी घेण्याची जी शिफारस केली होती तिला आता मंजूरी मिळाली असल्याचं समजतं आहे.
ही क्लिनिकल चाचणी 2 ते 18 वयोगटातील 525 लोकांवर केली जाणार आहे. जी दिल्ली एम्स, पाटणा एम्स आणि नागपूरच्या MIMS रुग्णालयात होईल. समितीच्या शिफारशीनुसार भारत बायोटेकला फेज 3 ची चाचणी सुरू करण्यापूर्वी फेज 2 चा संपूर्ण डेटा उपलब्ध करुन द्यावा लागेल.
SECने अशी शिफारस केली होती की, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या फेज 2, फेज 3 च्या क्लिनीकल चाचणीला मंजुरी दिली गेली पाहिजे. जी 2 ते 18 वयोगटातील मुलांवर केली जाईल.










