याला म्हणतात माणुसकी.. वर्षभरापासून Covid Positive मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे बहाद्दर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे

ADVERTISEMENT

अकोला: मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना… या ओळी आपल्याला बरंच काही शिकवून जातात. पण खरं तर आजच्या घडीला याच ओळींचा आज देशातील अनेकांना विसर पडलाय. पण असं असलं तरीही आजही काही उदाहरण अशी आहे की, ज्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. असंच एक उदाहरण हे अकोल्यातील कच्छी मेमन जमातीतील काही युवकाचं आहे.

माणुसकी म्हणजे काय असते हे गेल्या वर्षभरात या तरुणांनी दाखवून दिलं आहे. कोरोनाने महाराष्ट्रात मागील वर्षी शिरकाव केला. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीपासून ते कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहपर्यंत सगळ्याचविषयी भीती वाटते.

हे वाचलं का?

पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक, कुटुंबीय देखील भीतीने त्याच्या जवळ जात नाहीत. त्यामुळे अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रशासनासमोर मोठा प्रश्न होता. पण याच प्रश्नाचं निराकरण अकोल्यातील 10 मुस्लिम युवकांनी केलं आहे.

लसीकरणाबाबत अदर पूनावालांनी दिली आणखी एक गुड न्यूज!

ADVERTISEMENT

शहरातील आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारच्या जिल्ह्यातील तसेच राज्याबाहेरील कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी या 10 युवकांनी पार पाडली आहे.

ADVERTISEMENT

कोरोनाचे सर्व नियम पाळून हे दहाही जण आपलं काम इमाने-इतबारे पार पाडत आहेत. तसेच सर्व मृतदेहांवर त्या-त्या धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करत आहेत. अशी माहिती मेमन समाजाचे प्रमुख असलेले जावेद झकरिया यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत हजारच्यावर त्यात अधिकतर कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

कालपासून मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. या पवित्र महिन्यात काही युवक हे कडक उपवास करत आहेत. पण तरीही आपलं हे पुण्यकर्म करताना अजिबात मागे हटत नसल्याचं दिसतं आहे. इतकंच काय तर ऊन असो की, पाऊस कशाला न जुमानता हे युवक आपलं काम तितक्याच तत्परतेने पार पाडत आहेत.

जबरदस्त… मुंबई पोलिसांच्या ‘या’ कामाला तोड नाही!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत एका कुटुंबीयाने आपल्या घरातील सदस्याला अग्नी देण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर यापैकी एका मुस्लिम युवकाने हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे त्या व्यक्तीला अग्नी दिला होता. त्यातूनच या युवकांची समाजाप्रती असणारी तळमळ आपल्याला समजून येईल.

दरम्यान, यातील काही जणांना कोरोनाची लागण देखील झाली होती. पण त्याची तमा न करता देवाने आम्हाला हे पुण्य काम करण्यासाठी पाठवले आहे. घरचे याला विरोध करतात पण मानवता म्हणून हा आमचा आता रोजचा उपक्रम झाला आहे. असं हे तरुण सांगतात. 40 अंश तापमान असताना पीपीई कीट घालून हे तरुण निरंतर काम करत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून हे दहाही तरुण महापालिका प्रशासनाच्या नियमांनुसार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे ‘मुंबई तक’च्या वतीने माणुसकी जपणाऱ्या या तरुणांना मानाचा मुजरा!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT