कोरोनामुळे सोनिया गांधींची प्रकृती खालवली, दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी कोव्हिडच्या वाढलेल्या त्रासामुळे नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली होती. यानंतर त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं होते. पण त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व हितचिंतकांचे त्यांच्या काळजी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. त्याचवेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधींना चांगले आरोग्य आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही सोनिया गांधींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी यांच्या प्रकृतीबद्दल मी चिंतीत आहे, कोव्हिडशी संबंधित समस्यांमुळे त्यांना आज गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी त्यांना लवकरात लवकर बरे व्हावे आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.’

हे वाचलं का?

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 जून रोजी हजर राहण्यासाठी आधीच समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने 8 जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. आता त्या 23 जूनला ईडीसमोर हजर राहणार आहेत.

त्याचवेळी याच प्रकरणी ईडीने राहुल गांधींना 13 जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी यापूर्वी 2 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्यावेळी राहुल गांधी देशाबाहेर होते. यानंतर, एजन्सीने त्यांना 13 जून रोजी दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

ADVERTISEMENT

राहुल गांधी हे ईडीसमोर हजर होण्यापूर्वी सर्व खासदार आणि वरिष्ठ नेत्यांना पक्ष मुख्यालयात पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. 13 जून रोजी हे सर्वजण राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत.

ADVERTISEMENT

सोनिया गांधींपाठोपाठ प्रियंका गांधीही कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट करत दिली माहिती

2012 मध्ये चर्चेत आलेलं नॅशनल हेराल्ड प्रकरण

2012 मध्ये नॅशनल हेराल्डचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत ते विकत घेतलं आहे.

दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची 2000 कोटी रुपयांची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामींनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT