कोरोना रुग्णसंख्येनं वाढलीये चिंता! महाराष्ट्रासह केंद्राचं पाच राज्यांना पत्र, सतर्क राहण्याचे आदेश
कोरोनाच्या एक्सई या नव्या उपविषाणूची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांना पत्र पाठवलं असून, सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यातील नव्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या एक्सई या नव्या उपविषाणूची चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांना पत्र पाठवलं असून, सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यातील नव्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, दिल्ली, हरयाणा, केरळ आणि मिझोराम या राज्यांना पत्र पाठवलं आहे. पत्रात वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त करताना भूषण यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या नव्याने वाढत्या रुग्णसंख्येवर नजर ठेवली जावी. त्याचबरोबर गरज निर्माण झाल्यास आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.
मुंबईकरांनो काळजी घ्या ! शहरात कोरोनाच्या XE variant चा पहिला रुग्ण आढळला
केंद्र सरकारने १८ वर्षांवरील वयोगटातील सर्वांसाठी बुस्टर डोस घेण्यास परवानगी दिली असून, केंद्रीय सचिव राजेश भूषण शनिवारी सकाळ १०.३० वाजता बुस्टर डोज संदर्भात एक बैठकही घेणार आहेत.