Unlock in Aurangabad : जाणून घ्या आजपासून कोणत्या गोष्टींना मिळाली परवानगी
महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे तिकडे राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा झाली होती. या लॉकडाउनमध्ये काही भागांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने जनतेला काही प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत. निर्बंध शिथील करत असताना राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात ज्या ठिकाणी कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे तिकडे राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा झाली होती. या लॉकडाउनमध्ये काही भागांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने जनतेला काही प्रमाणात सवलती जाहीर केल्या आहेत.
निर्बंध शिथील करत असताना राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातही रुग्णसंख्येचा आढावा घेऊन निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
१ जून पासून औरंगाबादमध्ये या नियमांमध्ये झालाय बदल –
१) अत्यावश्यक सेवेतील दुकानं आता सर्व दिवस सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेपर्यंत सुरु राहतील.