Virar: नवऱ्यासोबतच्या भांडणाचा राग मुलीवर, बेदम मारहाणीत 2 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

झाकीर मेस्त्री, विरार

ADVERTISEMENT

विरारमध्ये एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन वर्षांच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण करत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला असून आरोपी आईला अटक केली आहे.

विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील पारिजात अपार्टमेंट या इमारतीमध्ये सहा महिन्यापूर्वी सोनुकूमार सोनी हा रिक्षाचालक आणि त्याची पत्नी नेहा हिच्यासोबत राहण्यासाठी आला होता. त्यांना नानसी नावाची दोन वर्षांची मुलगी देखील होती.

हे वाचलं का?

या ठिकाणी राहायला आल्यापासून या दाम्पत्यामध्ये सतत भांडणं होत होती. नवरा-बायकोच्या भांडणात मात्र मुलीला आईकडून बेदम मारहाण केली जात होती. नेहा सोनी हीचं आपल्या पतीसोबत भांडण झालं की, त्याचा सगळा राग आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीवर काढत असे.

शनिवारी देखील नेहा आणि सोनूकुमार यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. ज्यानंतर नेहाने आपल्या मुलीला बेदम मारहाण केली. निर्दयीपणे केलेल्या या मारहाणीत नानसी हिचा मात्र मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

मारहाणीमध्ये नानसी ही निपचित पडली होती. त्यामुळे आरोपी नेहाने ती बेशुद्ध झाली असावी असं वाटल्याने तिला उपचारासाठी विरारच्या ग्रामीण रुग्णालयात नेले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी जेव्हा मुलीला मृत घोषित केले. याप्रकरणी शनिवारी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, सोमवारी या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

कारण शवविच्छेदन अहवालात अशी माहिती समोर आली की, मुलीला मारहाण झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या प्रकरणी चौकशी केली. ज्यामध्ये मुलीची आई नेहा सोनी ही दोषी असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी तिला तात्काळ बेड्या ठोकल्या.

Sangli Murder: एकाच वेळी तिघांची हत्या, तिहेरी हत्याकांडाने सांगली जिल्हा हादरला

दोन वर्षाच्या या मुलीला गेल्या अनेक महिन्यापासून घरात मारहाण केली जात असल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप मुलीच्या वडिलांची नेमकी प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे आता पोलीस मुलीच्या वडिलांचा देखील जबाब नोंदवून घेत आहेत. तसंच मुलीला झालेल्या मारहाणीत त्याचा देखील सहभाग होता की नाही हे देखील पोलिसांकडून तपासलं जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT