Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या मृत्यूचं कारण समोर, डॉक्टर म्हणाले…
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर जवळ अपघाती निधन झाले. अपघातानंतर सायरस यांना कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यांनी सांगितले की सायरस मिस्त्री यांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणले होते. सायरस मिस्त्री रविवारी कारने अहमदाबादहून मुंबईला जात होते. त्यांच्यासोबत कारमध्ये […]
ADVERTISEMENT

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर जवळ अपघाती निधन झाले. अपघातानंतर सायरस यांना कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यांनी सांगितले की सायरस मिस्त्री यांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणले होते.
सायरस मिस्त्री रविवारी कारने अहमदाबादहून मुंबईला जात होते. त्यांच्यासोबत कारमध्ये चार जण होते. त्यांची कार मुंबईजवळ एका दुभाजकावर आदळली आणि या अपघातात मिस्त्री यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण रुग्णालयात दाखल आहेत.
सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. शुभम सिंह यांनी सांगितले की, सुरुवातीला सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल या दोघांना रुग्णालयात आणण्यात आले होते. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात आणलं गेलं त्यावेळी दोघंही मृत अवस्थेत होते. सायरस मिस्त्री यांना रुग्णालयात आणणाऱ्या स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचवेळी पंडोले यांचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यानंतर दुसरी रुग्णवाहिका दोन रुग्णांना घेऊन आली. दोघेही जखमी अवस्थेत होते. प्राथमिक उपचारानंतर दोघांना रेनबो रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर दोघांना विमानाने मुंबईला आणण्यात आले.