ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. ६० ते ७० च्या दशकात आशा पारेख या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी राजेश खन्ना, विनोद खन्ना यांच्यासह अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. त्या काळात आशा पारेख या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्ध होत्या.

ADVERTISEMENT

आशा पारेख वयाच्या १६ व्या वर्षापासून कार्यरत

आशा पारेख या वयाच्या १६ व्या वर्षापासून सिनेसृष्टीत काम करत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री या अभिनय क्षेत्रात सध्या सक्रिय नाहीत. मात्र त्यांच्या व्यवसायाचा व्याप मोठा आहे. अधूमधून त्या टीव शोजमध्ये परीक्षक म्हणूनही उपस्थित असतात.

सोशल मीडियावर अजिबात नाहीत आशा पारेख

सोशल मीडियावर आशा पारेख यांचं कुठलंही अकाऊंट नाही. वयाच्या ७९ व्या वर्षी सोशल मीडिया जॉईन करून कोणताही नवा त्रास करून घ्यायचा नाही असं मत त्यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं. तसंच सोशल मीडियाचा अतिरेक आवडत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आशा पारेख यांनी तिसरी मंझिल, दिल देके देखो, कटी पतंग, प्यार का मौसम, मेरा गाव-मेरा देश, कारवाँ असे अनेक एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमा आशा पारेख यांनी केले आहेत. राजेश खन्ना, शम्मी कपूर, जितेंद्र, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा अनेक बड्या स्टार्ससोबत आशा पारेख यांनी काम केलं आहे. तसंच फक्त हिंदी नाही तर गुजराती, पंजाबी, कन्नड सिनेमांमधूनही त्यांनी काम केलं आहे.

आशा पारेख २ ऑक्टोबर १९४२ ला झाला. १९५९ ते १९७५ या कालावधीत त्या हिंदी सिनेसृष्टीतल्या यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आशा पारेख यांना बालपणापासून नृत्याची आवड होती. त्यांच्या आई सुधार पारेख यांनी आशा यांना नृत्य शिकण्यासाटी शिकवणीही लावली होती. एकदा एका कार्यक्रमात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी आशा भोसले यांचं नृत्य पाहिलं. त्यावेळी आशा पारेख यांचं वय दहा वर्षे होतं. त्यानंतर १९५७ ला माँ या सिनेमात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर बाप-बेटी या सिनेमासह ९५ हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. राजेश खन्ना, मनोज कुमार, सुनील दत्त, धर्मेंद्र यांच्यासारख्या नावाजलेल्या अभिनेत्यासोबत आशा पारेख यांनी स्क्रिन शेअर केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT