आमच्या जिवाला धोका! रोज मिळत आहेत धमक्या, शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका
आमच्या जिवाला धोका आहे, रोज धमक्या मिळत आहेत हे म्हणत सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणखी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. महाराष्ट्रातलं सत्ताकारण आणि त्यावरून निर्माण झालेला संग्राम हा तूर्तास थांबेल असं मुळीच वाटत नाही. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांना एकीकडे केंद्राने वाय सुरक्षा दिली आहे. तर दुसरीकडे या सगळ्यांना शिवसेनेकडून इशारे दिले जात […]
ADVERTISEMENT

आमच्या जिवाला धोका आहे, रोज धमक्या मिळत आहेत हे म्हणत सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणखी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. महाराष्ट्रातलं सत्ताकारण आणि त्यावरून निर्माण झालेला संग्राम हा तूर्तास थांबेल असं मुळीच वाटत नाही. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांना एकीकडे केंद्राने वाय सुरक्षा दिली आहे. तर दुसरीकडे या सगळ्यांना शिवसेनेकडून इशारे दिले जात आहेत.
या सगळ्या धामधुमीत एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन केलं जातं आहे, तोडफोड केली जाते तसंच शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. यानंतर आता सुप्रीम कोर्टात धाव घेत एकनाथ शिंदे यांच्या गटाने आमच्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.
ही याचिका शिवसेनेच्या १५ बंडखोर आमदारांनी दाखल केली आहे. आमच्या कुटुंबीयांना धोका आहे, आमदारांच्या कुटुंबाला धोका आहे तसंच आम्हाला रोज धमक्या येत आहेत असंही यात म्हटल आहे. भारत गोगावले, प्रकाश सुर्वे, तानाजी सावंत, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, संजय शिरसाठ, यामिनी जाधव, अनिल बाबर, लता सोनवणे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, बालाजी कल्याणकर, बालाजी किणीकर या सगळ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत हेदेखील म्हटलं आहे की आम्ही शिवसेनेचं सदस्यत्व सोडलेलं नाही, असंही म्हटलं आहे. तसंच आम्हाला धमक्या देत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
त्यामुळे आता या याचिकेबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे आज उदय सामंत हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे गटातल्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या ३९ आणि अपक्ष आमदारांची संख्या १२ अशी एकूण ५१ झाली आहे.