Devendra Fadnavis : हो, मी गद्दारीचा बदला घेतला : शिवसेना फुटीवर फडणवीसांचं भाष्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : हो मी माझ्यासोबत झालेल्या गद्दारीचा बदला घेतला असं म्हणतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्तांतराच्या नाट्यावर भाष्य केलं. ते इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते. ते म्हणाले, आमच्या सर्व नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर घोषणा केली होती की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणुका लढविणार आहोत, ते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत, त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरेही टाळ्या वाजवत होते.

ADVERTISEMENT

त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागला आणि तुमच्या लक्षात आलं की आता आकड्यांचा खेळ फसणार आहे आणि तीन पक्ष एकत्र आल्यास आपण मुख्यमंत्री होऊ शकतो. त्याच्या आधी त्यांनी एकदाही याबाबतचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो की शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता. आम्ही त्यांना मंत्रालय वाढवून देण्याचा शब्द दिला होता, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचं वजन झालं कमी :

यावेळी कॉनक्लेव्हच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांचं वजन कमी झाल्याचं आणि शरीरावर बरीच मेहनत घेतल्याचं दिसून आलं. यालाच धरुन मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी राजकीय प्रश्न विचारतं तुमच्या शारीरिक वजनासोबतच उपमुख्यमंत्री झाल्यामुळे राजकीय वजनही कमी झालं आहे का? असा सवाल विचारला. यावर बोलताना ते म्हणाले, राजकारणात तुम्ही कोणत्या पदावर आहात यावर वजन ठरतं नसतं तर तो तुम्ही कोण आहे, त्यावर ठरतं असतं. त्यामुळे महाराष्ट्रात जाऊन कोणालाही विचारा माझं वजन कमी झालं की वाढलं.

हे वाचलं का?

म्हणून उपमुख्यमंत्री झालो… :

मुख्यमंत्री राहिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी होता, तेव्हा तुम्ही सत्तेसाठी हपापलेला आहात, असा संदेश जातो. त्यामुळे आम्ही जे सत्तापरिवर्तन केलं ते कोणतही सत्ता आणि खूर्चीसाठी केलं नव्हतं. महाराष्ट्रातील जी परिस्थिती होती, जी काही दुरवस्था झाली होती, ती सुधारण्यासाठी सत्ता परिवर्तन केलं होतं. त्यामुळे मी त्यावेळी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला होता की सत्तेच्या बाहेर राहणार.

पण मला पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की, तुम्ही पक्षाचे महाराष्ट्राचे नेते आहात. हे सरकार आपल्याला चालवायचं आहे. सरकारला तुमच्या अनुभावाची गरज लागेल. त्यामुळे तुम्हाला सरकारमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की तुम्ही या सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. त्यांनी मला हे पण सांगितलं एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशन अॅथॉरिटी ही सरकार चालवेल तर हे सरकार नीट चालू शकणार नाही, आज मागे वळून बघताना मला ही गोष्ट पटते. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या मागे खंबीरपणे उभं आहे, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT