निलंबीत DCP त्रिपाठींचा पाय खोलात, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
दक्षिण मुंबईतील अंगडीयांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणात आरोपी असलेले निलंबीत DCP सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणी वाढत जात आहेत. मुंबईतील सत्र न्यायालयाने सौरभ त्रिपाठी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून सौरभ त्रिपाठी हे फरार असून राज्य सरकारने त्यांना निलंबीत केलं आहे. त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्रिपाठी यांच्याशी […]
ADVERTISEMENT

दक्षिण मुंबईतील अंगडीयांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणात आरोपी असलेले निलंबीत DCP सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणी वाढत जात आहेत. मुंबईतील सत्र न्यायालयाने सौरभ त्रिपाठी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून सौरभ त्रिपाठी हे फरार असून राज्य सरकारने त्यांना निलंबीत केलं आहे.
त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्रिपाठी यांच्याशी संबंधित लोकांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्रिपाठी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. बुधवारी सत्र न्यायालयासमोर झालेल्या अंतिम सुनावणीदरम्यान अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर.एम.सदराणी यांनी त्रिपाठी यांच्या वकीलांचे युक्तीवाद फेटाळून लावत त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.
डीएसपी सौरभ त्रिपाठी हे २०१० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. मुंबईतल्या झोन २ चे डीसीपी असताना त्रिपाठी यांच्यावर अंगडीयांकडून खंडणी गोळा केल्याचा आरोप झाला होता. यानंतर त्यांची बदली Operations विभागात झाली. परंतू यानंतर ते आपल्या नव्या नियुक्तीवर रुजू झाले नाहीत. याआधी त्यांनी अहमदनगरचे पोलीस अधिक्षक म्हणून काम केलं आहे.
काय आहे अंगडीया खंडणी प्रकरण?