बंगळुरु: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा अत्यंत संतापजनक घटना कर्नाटक राज्यातील बंगळुरु मध्ये घडला आहे. या घृणास्पद प्रकारामुळे संपूर्ण शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमी देखील संतापले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवाजी […]
ADVERTISEMENT
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा अत्यंत संतापजनक घटना कर्नाटक राज्यातील बंगळुरु मध्ये घडला आहे. या घृणास्पद प्रकारामुळे संपूर्ण शिवप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. या घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमी देखील संतापले आहेत.
ADVERTISEMENT
मागील अनेक महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून वारंवार केला जात होता. या सगळ्या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर बंगळुरुतील शिवप्रेमी हे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी धर्मवीर संभाजी चौकामध्ये जमून थेट चक्का जाम काले. यावेळी काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे शनिवारी बेळगावमध्ये संपूर्ण शहर जवळजवळ बंदच होतं. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.
हे वाचलं का?
Karnataka | A group of people staged a protest at Sambhaji Circle late night Friday condemning the “desecration of Chatrapati Shivaji Maharaj's statue at Bengaluru”, demanding action against culprits behind the incident pic.twitter.com/wdETdXuz0d
— ANI (@ANI) December 17, 2021
कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधील सदाशिवनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कर्नाटकातील काही समाजकंटकांनी विटंबना केल्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत आहेत. कोल्हापूरमधील शिवसैनिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
बंगळुरूत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, महाराष्ट्रात पडसाद
ADVERTISEMENT
बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. तर बेळगाव शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून 144 कलम लागू करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात शिवसैनिकांनी कर्नाटकात जाणाऱ्या बसेसवर भगव्या अक्षरात शिवसेना, जय महाराष्ट्र लिहिले. तर अनेक ठिकाणी काळा स्प्रे मारून निषेध देखील नोंदविला. यावेळी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT