नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष तीव्र झाला आहे. भाजपचे नेते सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार हे राजीनामा घ्यायला तयार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्याजवळ जमून शांततेच्या पद्धतीने आंदोलनही केलं. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पुण्यात पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मागच्या काही तासांपासून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. आता अखेर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत अजित पवार?

आजपर्यंत अनेकांनी पाहिलं आहे की केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. कुणीतरी पहाटे तीनला ट्विट करतं आणि साडेपाचला लोक तिथे जातात. याचा अर्थ सगळ्यांनाच कळतो ना. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भूमिका स्पष्ट केलं. मला जी माहितीनुसार हे 93 चं प्रकरण आहे. आता आपण २०२२ मध्ये आहोत. ती जागा ज्याची होती त्याचं करार वगैरे सगळं दिलं आहे. नवाब मलिक न्याय व्यवस्थेच्या मार्फत भूमिका मांडत आहेत.

ADVERTISEMENT

न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून उत्तर दिलं जातं आहे. सरकारं येतात, जातात. मात्र द्वेष भावनेतून वागायचं की नाही वागायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. कालही काही लोकांवर धाडी पडल्या. धाडी पडताना एक पक्षाच्या कार्यकर्ता नेता सोडून, बाकी सगळ्यांवर पडतात यावरून काय बोध घ्यायचा तो जनतेने घेतला पाहिजे. भाजपचे नेते जे म्हणत आहेत की सरकार टीकत नाही त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही कारण मी नेहमी सांगितलं आहे हे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आहे. यामध्ये महाराष्ट्राचा विकास होणार नाही. ज्याला काही म्हणायचं आहे ते म्हणू द्या. आमचं काम भलं आणि आम्ही भले. ज्याचं बहुमत असतं त्यांचाच कारभार असतो. मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. जे कुणी तारखा देत आहेत त्याला आम्ही काय करायचं? असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जे जे रूग्णालयात दाखल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT