औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं…
औरंगाबादचं संभाजीनगर हे नामकरण तसंच उस्मानाबादचं धाराशिव हे नामकरण आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाणारच आहे, यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबतची घोषणा केली आहे. आम्ही आधीच्या सरकारने घेतलेला म्हणजेच ठाकरे […]
ADVERTISEMENT

औरंगाबादचं संभाजीनगर हे नामकरण तसंच उस्मानाबादचं धाराशिव हे नामकरण आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाणारच आहे, यात कुठलंही दुमत असण्याचं कारण नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबतची घोषणा केली आहे. आम्ही आधीच्या सरकारने घेतलेला म्हणजेच ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय रद्द केला आहे. कारण त्यांना बहुमत सिद्ध करा हे राज्यपालांनी सांगितलेलं असताना आणि त्यांचं सरकार अल्पमतात आहे हे माहित असताना त्यांनी कॅबिनेट बोलवली आणि घाई घाईत हा निर्णय घेतला. तो निर्णय वैध नव्हता, आमच्याकडे बहुमत आहे आमचं सरकार हा निर्णय घेईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती दिली ही बातमी येताच विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा नातेवाईक लागतो का? हा प्रश्नही टीका करताना विचारून टाकला. या सगळ्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टीकरण दिलं आहे आणि बहुमत असलेलं आमचं सरकार हा निर्णय घेईल हे देखील सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणखी काय म्हणाले?