प्रियंका चर्तुर्वेदी-अमृता फडवणीसांमध्ये घमासान; ‘मॅडम चतूर… औकात… अन्’
Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi Twitte Fight : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना अनिक्षा नावाच्या डिझायनरने 1 कोटीची ऑफर देऊन पैसे कमावण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हे प्रकरण जास्त अंगलट आल्याचे कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणाची […]
ADVERTISEMENT

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi Twitte Fight : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना अनिक्षा नावाच्या डिझायनरने 1 कोटीची ऑफर देऊन पैसे कमावण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर हे प्रकरण जास्त अंगलट आल्याचे कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आले होते. या प्रकरणाची माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देखील दिली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चर्तुर्वेदी (Priyanka Chaturvedi) आणि अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आरोप केले होते. या दरम्यान प्रियंका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीसांमध्ये ट्विटरवर शाब्दीक वार रंगला होता.(designer aniksha 1 crore bribe case amruta fadnavis and mp priyanka chaturvedi twitter war)
खासदार प्रियंका चर्तुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या संबंधित या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एका गुन्हेगाराच्या मुलीला मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी 5 वर्षाहून अधिक काळ मैत्री होते. तसेच प्रमोशनच्या नावाखाली बायकोला दागिने, घालायला कपडे, तिच्याच गाडीत तिच्यासोबत हिंडायला मिळते, असे फडणवीसांचे विधानसभेतील तंतोतंत विधान चर्तुर्वेदी सुरुवातीला ट्विटमध्ये मांडले.
अमृता फडणवीसांना 1 कोटी लाचेची ऑफर; मुंबईतील डिझायनरवर गुन्हा, प्रकरण काय?
डिझायनर मैत्रिण बुकींची तक्रार करून, छापा टाकत त्यांच्याकडून पैसे कमवू अशी डिल करते. तरीही त्यांची मैत्री कायम राहते, या गोष्टीकडे प्रियंका चर्तुर्वेदी (Priyanka Chaturvedi) लक्ष वेधले. आता या प्रकरणात व्हिडिओ आणि ब्लॅकमेलचे आरोप होतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात चाललंय तरी काय असा सवाल चुर्तुवेदी यांनी यावेळी उपस्थित केला.