विदर्भाचं रक्त धमन्यांमध्ये असेल तर बेईमानी करु नका-फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी असं म्हणाले की आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचं रक्त आहे. मला इतका आनंद झाला ते वक्तव्य ऐकून.. की काय सांगू? किमान हे म्हणण्याची वेळ तर आली. किमान हे म्हणण्याची तर वेळ आली.. हे आमचं यश आहे. मात्र मला मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं आहे की विदर्भाचं प्रेम अनेकांनी दाखवलं आहे, पण त्यांनी विदर्भाशी बेईमानीही केली आहे, तुम्ही ती बेईमानी करु नका.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसंच विदर्भ वैधानिक विकास महामंडळं का बंद झाली हा प्रश्नही विचारला.

ADVERTISEMENT

आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वर्षभराचा लेखाजोखा या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली.

आणखी काय म्हणाले फडणवीस?

हे वाचलं का?

“विदर्भाला, मराठवाड्याला संरक्षण मिळालं होतं ते वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून..ही मंडळं बंद करण्याचं पाप कुणी केलं? ते उद्धवजींनी सांगितलं पाहिजे आणि त्यानंतर विदर्भाच्या रक्ताबद्दल बोललं पाहिजे. आज या सरकारकडून जी वागणूक मराठवाड्याला आणि विदर्भाला मिळते आहे त्याबद्दलही विचार झाला पाहिजे. मराठवाड्यातले सिंचन प्रकल्प बंद आहेत? मुंबईची अवस्थाही काय करुन ठेवली आहे पाहिली का?” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले होते त्यासंदर्भातला व्हिडीओ

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

ADVERTISEMENT

गोरेवाडा येथील राष्ट्रीय उद्यानाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विदर्भावर एक वक्तव्य केलं होतं. “आमच्या धमन्यांमध्ये विदर्भाचं रक्त आहे, आम्हाला विदर्भाचं प्रेम कुणीही शिकवू नये.” असं ते म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली होती. या टीकेला आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT