केंद्रीय अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेलं बजेट महत्त्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर भारताचं बजेट आहे असंच मी याचं वर्णन करेन अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सध्या आपण एका संक्रमणाच्या काळातून जातो आहोत. करोनाचं संकट जगावर आणि आपल्या देशावरही आहे. त्या परिस्थितीतही अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळेल याचा विचार कऱणारं हे बजेट होतं असंच मी म्हणेन असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विशेषतः काही क्षेत्रांवर या बजेटचा फोकस होता.

ADVERTISEMENT

आरोग्य, आर्थिक सुधारणा, पायाभूत सेवा-सुविधा, सर्वसमावेशक विकास, मानव संसाधन, नाविन्यता संशोधन आणि मिनिमम गव्हर्मेंट मॅग्झिमम गव्हर्नन्स या मुद्द्यांवर या बजेटचा फोकस होता. या सगळ्या सूत्रांवर अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. विशेषतः विविध तरतुदींसोबत भारताचं शेतीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रातली आर्थिक तरतूद 2013-14 च्या तुलनेत या अर्थसंकल्पात पाच पटीने वाढली आहे. जे लोक कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार असं म्हणत होते त्यांची तोंडं बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. MSP चे आकडे अर्थमंत्र्यांनी जे आकडे दिले ते या संदर्भात विरोध करणाऱ्यांना आरसा दाखवणारे होते असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. हमीभावाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता. मात्र अशी कोणतीही परिस्थिती नाही हेच या बजेटने दाखवून दिलं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

16 लाख कोटी रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्रांसाठी 40 हजार कोटींची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे ग्रामीण पायाभूत क्षेत्र विकसित होणार आहे असंही देवेंद फडणवीस यांनी स्पष्ट केलं. असंघटीत काम करणारा देशातला जो मजूर आहे त्याच्यासाठीही महत्वाचे निर्णय आजच्या बजेटमध्ये घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

कोरोनाच्या काळानंतर आरोग्य क्षेत्राचं सशक्तीकरण हे आवश्यक आहे त्यासाठीही या बजेटमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT