Devendra Fadnavis: ’20-20 ची मॅच आहे, अडीच वर्ष वाया गेली पण..’, फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis has strongly criticized the Thackeray group: पुणे: एकीकडे शिंदे गटाला (Shinde Group) शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and arrow) हे चिन्ह मिळालेला असल्याने शिंदे गटासह भाजपचा (BJP) देखील उत्साह चांगलाच वाढला आहे. अशातच पुण्यात (Pune) मोदी @20 (Modi @20) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याचवेळी उद्धव […]
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis has strongly criticized the Thackeray group: पुणे: एकीकडे शिंदे गटाला (Shinde Group) शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and arrow) हे चिन्ह मिळालेला असल्याने शिंदे गटासह भाजपचा (BJP) देखील उत्साह चांगलाच वाढला आहे. अशातच पुण्यात (Pune) मोदी @20 (Modi @20) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याचवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार टोला हाणला. ‘आता सध्या 20-20 ची मॅच आहे. अडीच वर्ष वाया गेली आहेत. अडीचच वर्ष हातात आहेत.’ असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. (it is a t-20 match two and a half years have been wasted devendra fadnavis taunted to thackeray group)
ADVERTISEMENT
मोदी @20 या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा आज (18 फेब्रुवारी) पुण्यात आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात आपल्या छोटेखानी भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली.
पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले…
‘मोदींच्या नेतृत्वात शिंदेजी आणि मी याठिकाणी महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परिवर्तन सुरू केलंय. मला विश्वास आहे की, 20-20 ची मॅच आहे. अडीच वर्ष वाया गेली आहेत. अडीचच वर्ष हातात आहेत. पण शिंदेजी आणि आम्ही आता डबल हॉर्स पॉवरची गाडी हातात घेतली आहे. मोदीजींचं इंजिन हे लागल्यानंतर ती सुसाट वेगानेच धावणार आहे. त्यामुळे अडीच वर्षात जे होऊ शकलं नाही ते उरलेल्या अडीच वर्षात करून पाच वर्ष जेव्हा पूर्ण होतील त्यावेळी तुमची स्वप्न पूर्ण करूनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ.’ असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?
धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळाल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
“हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथराव शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगत होतो की, खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना विचारांची शिवसेना आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.
“त्यांनी (ठाकरे गट) दोन स्क्रिप्ट तयार करून ठेवल्या होत्या. निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, तर निवडणूक आयोगाने खूप चांगलं आणि निष्पक्षपणे काम केलं आहे. विरोधात निकाल गेल्यानंतर दुसरं टाईप करून ठेवलं होतं की, निवडणूक आयोग दबावाखाली आहे. ते त्यांच्या स्क्रिप्टनुसार चालत आहे. पण निवडणूक आयोग असो वा सुप्रीम कोर्ट हे कायद्यानुसार चालतात आणि न्यायाने चालतात”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधलेला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT