Maharashtra Bandh: ‘जालियनवाला बाग तर पुण्यातील मावळमध्ये झालेलं’, फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
मुंबई: ‘हे तेच लोकं आहेत ज्यांनी पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळमधील (Maval) पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या झाडून ठार मारलं होतं. ते जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) होतं. म्हणून मला वाटतं की, जालियनवाला बागेची आठवण देणारे जे लोकं आहेत ते बहुदा मावळची गोष्ट विसरले आहेत.’ अशी प्रतिक्रिया देत भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी […]
ADVERTISEMENT
मुंबई: ‘हे तेच लोकं आहेत ज्यांनी पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळमधील (Maval) पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना गोळ्या झाडून ठार मारलं होतं. ते जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) होतं. म्हणून मला वाटतं की, जालियनवाला बागेची आठवण देणारे जे लोकं आहेत ते बहुदा मावळची गोष्ट विसरले आहेत.’ अशी प्रतिक्रिया देत भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
‘मावळची जी घटना झाली होती त्यावेळी याच लोकांचं सरकार होतं. याच सरकारने शेतकऱ्यांवर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं होतं. त्यामुळे आताचं हे सरकार देखील ढोंगी सरकार आहे. आम्ही त्यांची निंदा करतो.’ असं म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खिरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाबाबत आज (11 ऑक्टोबर) महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन पुकारलं आहे. पण हे आंदोलन पुकारणारं सरकार ढोंगी आहेत. अशी तिखट प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हे वाचलं का?
शरद पवारांवर निशाणा साधताना पाहा फडणवीस काय-काय म्हणाले:
‘या सरकारकडून शेतकऱ्यांना एक पैशाची मदत नाही’
ADVERTISEMENT
‘हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. कारण लखीमपूर करता महाराष्ट्रात बंद केला जातो पण एका नव्या पैशाची मदत हे शेतकऱ्याला करत नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी 2000 आत्महत्या केल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने घोषणा केल्या. बांधावर जाऊन 25000 आणि 50000 च्या घोषणा हवेत विरल्या.’ असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर बरीच टीका केली.
ADVERTISEMENT
‘आजचा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस’
‘वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती आल्या त्यावर मदतच केली नाही. केली तर ती पण एवढी तोकडी मदत केली की, शेवटी त्यांच्या घटक पक्षातील लोकांनाही म्हणावं लागलं की, पूर्वीचं भाजपचं सरकार बरं होतं. ते मदत करायचे पण ज्या सरकारला आम्ही मदत करतो ते सरकार मात्र मदत करायला तयार नाही. त्यामुळे आजचा जो बंद आहे तो ढोंगीपणाचा कळस आहे.’ अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली आहे.
‘उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती’, लखीमपूर घटनेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया
‘मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळी झाडल्या ते जालियनवाला बाग होतं’
‘ही तीच मंडळी आहेत ज्यांनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना काही नैतिकता तरी आहे का? अशा प्रकारचं आंदोलन करायची. शेतकऱ्यांवर ज्या गोळ्या झाडल्या गेल्या ते जालियनवाला बाग होतं. म्हणून मला वाटतं की, जालियनवाला बागेची आठवण देणारे जे लोकं आहेत ते बहुदा मावळची गोष्ट विसरले आहेत.’
‘या’ बंदबाबत हायकोर्टाने दखल घ्यावी’
‘मी तर उच्च न्यायालयाला विनंती करतोय की, अशाप्रकारचा बंद करण्याकरिता प्रतिबंध घातलेला आहे. हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल असं सांगितलेलं आहे. अशाच अवमानप्रसंगी शिवसेनेला यापूर्वी याठिकाणी त्यांना दंड देखील ठोठावला होता. त्यामुळे जे वारंवार न्यायालयाचा अवमान करतायेत त्यांच्या संदर्भात न्यायालयाने स्वत: त्याची दखल घेतली पाहिजे असं आमचं मत आहे.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT