Shiv Sena Bhavan: ‘आम्ही तोडफोड करत नाही, ती आमची संस्कृती नाही’, फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई तक

योगेश पांडे, नागपूर भाजपचे (BJP) विधान परिषदचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) तोडण्याचं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे अनेक नेते आता भाजपवर निशाणा साधत आहेत. याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी असं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

भाजपचे (BJP) विधान परिषदचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) तोडण्याचं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे अनेक नेते आता भाजपवर निशाणा साधत आहेत. याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी असं म्हटलं आहे की, ‘तोडफोड करणं आमची संस्कृती नाही.. आम्ही तोडफोड करत नाही.’ त्यामुळे फडणवीसांकडून या वादावर आता पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस हे नागपुरात असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारणा केली असताना त्यांनी असं म्हटलं आहे.

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

    follow whatsapp