देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली अमित शाह यांची भेट, ‘हे’ आहे कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. गोवा विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात अमित शाह यांच्याशी त्यांनी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मंत्री मायकेल लोबोही उपस्थित होते. महाराष्ट्रातील खास करून मराठवाड्यातील पाऊस आणि पूरस्थिती याचीही तपशीलवार माहितीही अमित शाह यांना देण्यात आली असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 20 सप्टेंबरला त्यांनी गोव्याचा दौरा केला होता. तसंच 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर ते लक्ष केंद्रीत करत आहेत. भाजपसाठी व्यूहरचना कशी करायची ते फडणवीस ठरवत आहेत. वरिष्ठ नेते पुढील 3-4 महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकूण परिस्थितीचा आढावा घेतील. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजप नेत्यांची टीम ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कॅबिनेट मंत्री आणि पक्षातील आमदारांशी चर्चा करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही अभ्यासू नेते अशी आहे. त्यामुळेच त्यांच्यावर आता गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.

हे वाचलं का?

Devendra Fadnavis: गोवा कसं राखणार?, फडणवीस ठरवणार विधानसभा निवडणुकीची रणनीती

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात मोठा राजकीय पेच पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र, भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अनेक डावपेच आखून गोव्यातील आपली सत्ता कायम ठेवली होती. तेव्हापासून गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ही डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, गोव्यात भाजपला खरी ओळख मनोहर पर्रिकर यांच्यामुळेच मिळाली. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण आता भाजप पहिल्यांदाच पर्रिकरांशिवाय विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अशावेळी निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीसांवर देखील अधिक जबाबदारी असणार आहे.

ADVERTISEMENT

फडणवीस यांचा निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा अनुभव गोव्यातील भाजपसाठी फायदेशीर ठरु शकतो म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे मागच्या दहा दिवसात काय काय घडलं त्याची माहिती आज देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांना दिली आहे.

मराठवाड्याच्या पुराबाबत काय म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांनी?

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत, मात्र आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नागरिकांनी धीर सोडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना केलं आहे. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीने सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT