सहा संशयित दहशतवाद्यांच्या अटकेबाबत देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातला एक संशयित दहशतवादी हा मुंबईचा आहे. याबाबत चिंता व्यक्त होते आहे अशात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांपैकी एकजण मुंबईचा आहे याबाबत विचारलं असता […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातला एक संशयित दहशतवादी हा मुंबईचा आहे. याबाबत चिंता व्यक्त होते आहे अशात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांपैकी एकजण मुंबईचा आहे याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ही फारच गंभीर गोष्ट आहे. देशाच्या विविध भागांमध्ये आणि खासकरून मुंबईत दहशतवादी सापडणं ही धोक्याची घंटा आहे. मला वाटतं या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. अशा ठिकठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणं गरजेचं आहे, कुठलाही घातपात किंवा दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना संपवूनच टाकलं पाहिजे’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने मंगळवारी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून एकूण सहा जणांना अटक केली. यामध्ये जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, ओसामा उर्फ सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ साजू उर्फ लाला या सगळ्यांना अटक केली आहे. हे सगळेजण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या ठिकाणी घातपाती कारवाया करणार होते. अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी दोघांनी पाकिस्तानला जाऊन ट्रेनिंग घेतलं होतं.
काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT
पाकिस्तानच्या एका मोठ्या दहशतवादी मोड्युलचा दिल्ली पोलीस आणि युपी एटीएसने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव समीर असं आहे तो ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करतो ही माहिती आता समोर आली आहे. पाकिस्तानच्या ISI या अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनेने या सगळ्यांना फंडिंग केलं होतं.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली. त्यामध्ये समीर कालिया 12 सप्टेंबरपासून गायब होता आणि 14 तारखेला त्याला अटक झाली तेव्हाच ही बाब समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार समीर कालिया मुंबईहून दिल्लीला जात असताना कोटा या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली.
याच मुद्द्यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. मात्र कुणीही या सगळ्या गोष्टींचं राजकारण करू नये असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी भाजपला दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT