Neeraj Chopra च्या रुपात घरात गणपती बाप्पाची स्थापना, यवतमाळच्या गावंडे दाम्पत्याचं अनोखी भक्ती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत अखेरच्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होतंय. भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई करणारा नीरज हा भारताला अॅथलेटिक्समध्ये पदक मिळवून देणारा पहिला भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राच्या या अनोख्या आणि ऐतिहासिक कामगिरीचं यवतमाळमध्ये एका वेगळ्या स्वरुपात कौतुक करण्यात आलंय.

ADVERTISEMENT

यवतमाळच्या गावंडे दाम्पत्याने नीरज चोप्रा भाला फेकतानाच्या रुपातली गणपती बाप्पाची मूर्ती घरात स्थापन केली आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर नियम आणि बंधनांचं सावट असलं तरीही घरगुती गणेशोत्सवात भक्त आपली हौसमौज भागवून घेत आहेत. यवतमाळच्या वैष्णवी आणि अक्षय गावंडे या दाम्पत्याने नीरजच्या या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी गणपती बाप्पाची खास मूर्ती घरात स्थापन केली आहे.

मूर्तीकार अमित खंडार यांनी ही मूर्ती बनवली आहे. आपल्या या खास बाप्पाच्या सजावटीसाठी गावंडे दाम्पत्याला २० दिवसांचा कालावधी लागला. यवतमाळमध्ये गावंडे दाम्पत्याच्या या बाप्पाची चर्चा असून अनेक भाविक ही सजावट पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT