महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 96 टक्के
महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 548 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 72 हजार 268 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात 8 हजार 418 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात 171 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.2 टक्के इतका झाला आहे. वाढलेल्या […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 548 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 72 हजार 268 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात 8 हजार 418 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात 171 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.2 टक्के इतका झाला आहे. वाढलेल्या मृत्यूदराने पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवली आहे. कारण सोमवारपर्यंत राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के होता. मागील पंधरा दिवस हा दर इतकाच होता आज तो आणखी वाढला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 29 लाख 8 हजार 288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 13 हजार 335 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 38 हजार 832 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 447 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज एकूण 1 लाख 14 हजार 297 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 8 हजार 418 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 61 लाख 13 हजार 335 झाली आहे.
आज राज्यात नोंद झालेल्या एकूण 171 मृत्यूंपैकी 127 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 44 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोव्हिड 19 पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 224 ने वाढली आहे. हे 224 मृत्यू, पुणे-66, रायगड-44, सांगली-29, ठाणे-22, पालघर-10, सातारा-10, औरंगाबाद-6, नाशिक-6, हिंगोली-5, कोल्हापूर-5, सोलापूर-5, गडचिरोली-4, चंद्रपूर-3, जालना-2, अहमदनगर-1, जळगाव-1, नागपूर-1, नंदुरबार-1, उस्मानाबाद-1, परभणी-1 आणि सिंधुदुर्ग-1 असे आहेत.
हे वाचलं का?
दहा हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्णसंख्या असलेले जिल्हे
मुंबई – 12 हजार 240
ADVERTISEMENT
ठाणे – 16 हजार 670
ADVERTISEMENT
पुणे- 16 हजार 524
सांगली- 10 हजार 870
कोल्हापूर- 12 हजार 988
महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. कोल्हापूर आणि सांगली या शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT