पुण्यात बिर्याणीवरून वादावादी, पैसे मागणाऱ्या व्यावसायिकाला सळईने बेदम मारहाण
पुण्यात बिर्याणीवरून वादावादी झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. आता पुण्यात पुन्हा एकदा बिर्याणीवरून फक्त वादावादी नाही तर हाणामारी झाली आहे. बिर्याणीचे पैसे मागितल्या कारणावरून एका केटरिंग व्यावसायिकाला तिघा जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या हडपसर भागात एका केटरिंग व्यावसायिकाला तिघाजणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा […]
ADVERTISEMENT

पुण्यात बिर्याणीवरून वादावादी झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. आता पुण्यात पुन्हा एकदा बिर्याणीवरून फक्त वादावादी नाही तर हाणामारी झाली आहे. बिर्याणीचे पैसे मागितल्या कारणावरून एका केटरिंग व्यावसायिकाला तिघा जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या हडपसर भागात एका केटरिंग व्यावसायिकाला तिघाजणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
ऋषिकेश समाधान कोलगे, विनायाक मुरगंडी आणि शुभम लोंढे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. या प्रकरणी मैनुद्दीन जलील खान यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील काळे बोराटे नगर भागात फिर्यादी मैनुद्दीन जलील खान यांचा बिर्याणीचा व्यवसाय आहे. या ठिकाणी ते बिर्याणी आणि अन्य खाद्य पदार्थांचे पार्सल देत असतात. घटनेच्या दिवशी म्हणजेज गुरूवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिन्ही आरोपींनी खान यांच्याकडून बिर्याणी पार्सल घेतली. पार्सल घेतल्यानंतर तिन्ही आरोपी निघून जाऊ लागले.त्यावेळी खान यांनी या तिघांनाही बिर्याणीचे पैसे द्या अशी विनंती केली. मात्र आरोपींनी बिर्याणीचे पैसे दिले नाहीतच उलट खान यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली आणि दमदाटी करण्यास सुरूवात केली. त्यातून वाद वाढत गेला.










