डोंबिवली : अंगावर शहारे आणणारी घटना! केबलने गळफास घ्यायला गेला अन्… टेरेसवरून पडून मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डोंबिवली पश्चिमेकडील गोमंतक बेकरी परिसरात मंगळवारी रात्री दुर्दैवी घटना घडली. बेरोजगार असलेल्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी गळफास केलेला केबल तुटल्याने इमारतीवरून खाली कोसळून व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

बेरोजगार असलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीने इमारतीच्या टेरेसवर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील गोमंतक बेकरी समोरील रोहिणी इमारतीत ही घटना घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.

…अन् रागाच्या भरात नातवाने आजीचाच घेतला जीव; नागपुरातील ‘त्या’ हत्येचं गुढ उलगडलं

हे वाचलं का?

तब्येत बरी नाही म्हणून रुममध्ये गेला अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ चंद्रकांत पतंगराव ( ४० ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दशरथ हा आईवडील, बहीण आणि भावजय यांच्याबरोबर राहत होता.

ADVERTISEMENT

दशरथ बेरोजगार होता. मात्र, त्याच्या बहिणीचा इमारतीच्या खालीच फुले विकण्याचा व्यवसाय आहे. तिच्या व्यवसायावर घराचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, मंगळवारी रात्री दशरथने कुटुंबियांसोबत जेवण केलं.

ADVERTISEMENT

डोंबिवली : टिळकनगरमधील महिलेच्या हत्येचं गुढ उलगडलं; २४ तासांत समोर आलं कारण

त्यानंतर आपली तब्बेत बरी नसल्याचं तो कुटुंबीयांना म्हणाला. त्याचे घर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर (टेरेसवर) आहे. कुटुंबीय घरात असताना दशरथने इमारतीच्या टेरेसवरील कठड्यावर उभा राहून केबलच्या वायरने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, केबलची वायर तुटल्याने तो थेट इमारतीवरून खाली कोळसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT