Pune Crime: पत्नीला फसवून नेलं बाहेर, चारित्र्याच्या संशयातून पतीने केली गळा चिरून हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पत्नीच्या (Wife) चारित्र्यावर सतत संशय (doubting the character of the wife) असल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या (Pune) हडपसर येथील गाडीतळ येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अंजली नितीन निकम (वय 22) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती नितीन निकम (वय 32) असे आहे. सध्या पुण्यात राहणारा नितीन हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असल्याची माहिती मिळते आहे.

हडपसर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक आर. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि अंजली या दोघांचं काही वर्षांपूर्वीच लग्न झाल होतं. त्यांना चार वर्षाचा एक मुलगा देखील आहे. नितीन हा भोसरी येथील एका कंपनीत कामाला होता. मात्र त्याच्या पत्नीचे विवाहबाह्य संबध असल्याचे नितीनला समजले. त्यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, सततच्या वादाला वैतागून पत्नी अंजली ही हडपसर येथील गोसावी वस्ती येथे नातेवाईंकाकडे राहण्यास आली होती. पत्नीला घेण्यास नितीन हडपसर येथे शनिवारी दुपारच्या सुमारास आला होता.

यावेळी त्याने अंजलीला सांगितलं की, मुलाला त्याने भावासोबत गावाकडे पाठवलं होतं. पण आता तो इकडे येण्यास तयार होत नाही. तर आपण मुलाला घेऊन इकडे येऊ. मात्र तरीदेखील पत्नी अंजली नितीनसोबत जाण्यास तयार नव्हती. त्यावेळी तिच्या नातेवाईकांनी तिची समजूत काढली. त्यामुळे ती जाण्यास तयार झाली.

ADVERTISEMENT

यावेळी नितीन आपल्या बाइकने अंजलीला घेऊन निघाला. गोसावी वस्तीवरून गाडीतळ येथील एका शाळेजवळ येतात पती नितीनने गाडी थांबवली आणि अजंलीला तिथेच थांबण्यास सांगितलं.

ADVERTISEMENT

अंजली देखील पतीवर विश्वास ठेऊन तिथेच थांबली. पण त्यानंतर नितीन हा पत्नीच्या मागच्या आला आणि त्याने तिचा चाकूने थेट गळाच चिरला. त्यानंतर अंजली ही रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडून राहिली.

पुण्यात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली हत्या

या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी त्यांनी आरोपी नितीनला तात्काळ अटक केली. तसेच नितीन निकम याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणात पोलीस वेगवेगळ्या बाजूने सध्या तपास करत आहेत. तसंच या प्रकरणी आरोपी पतीला इतर कोणी साथ दिली आहे का? याचा देखील ते तपास करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT