USFDA ने Covaxin ला तातडीच्या वापराची संमती नाकारली, डॉ. व्ही. के. पॉल म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

USFDA ने Covaxin ला तातडीच्या वापराची संमती नाकारली आहे. त्यावर नती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. व्ही. के. पॉल म्हणतात ‘अमेरिकेच्या FDA ने जर संमती नाकारली असेल तर तो संपूर्णतः त्यांचा विषय आहे. त्या देशाचा निर्णय आहे. त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. मात्र आपल्या देशातल्या लसीकरणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. आपल्याकडे ही लस प्रभावी आहे हे अभ्यासलं गेलं आहे. आपल्याकडे या लसीच्या वापराला संमतीही मिळाली आहे त्यामुळे अमेरिकेने काय म्हटलं आहे त्यांच्या निर्णयाचा आपल्या देशाच्या लसीकरणावर काहीही परिणाम होणार नाही.

V. K. पॉल यांनी जरी हे स्पष्ट केलं असलं की अमेरिकेने कोव्हॅक्सिनच्या तातडीच्या वापराला संमती नाकारली आहे तरीही आपल्याकडे आता कोव्हॅक्सिनबाबत चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेने संमती नाकारली आहे त्याचा काही परिणाम होईल का? काय सुरू आहे चर्चा जाणून घेऊ.

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन ही लस तयार केली आहे. अमेरिकेने या लसीच्या तातडीच्या वापराला मंजुरी दिलेली नाही. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनने भारत बायोटेकच्या व्हॅक्सिनला मंजुरी देण्यासाठी आणि माहिती मागितली आहे. भारत बायोटेकचा अमेरिकेतील भागीदार ओक्यूजेने अमेरिकेच्या FDA मध्ये लसीच्या तातडीच्या वापसाठी निवदेन दिलं होतं. ओक्यूजेन ने प्रसिद्ध केलेल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे की… USFDA ने ओक्यूजनला सल्ला दिला आहे की त्यांनी आपल्या व्हॅक्सिनला तातडीच्या वापराची संमती मागण्याऐवजी BLA अर्थात Biologics License Applications साठी अर्ज करायला हवा असं म्हटलं आहे. ही पूर्णपणे संमती मिळण्याची प्रक्रिया असते. त्यासाठीच FDA ने व्हॅक्सिनची जास्त माहिती आणि डेटाही मागितला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

का नाही मिळाली मंजुरी?

आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसर ओक्यूजेनला कोव्हॅक्सिनच्या तातडीच्या वापरासाठी मंजुरी मिळाली नाही कारण या लसीच्या ट्रायलचा अंशिक डेटाच सादर करण्यात आला आहे. मार्च महिन्यात हा डेटा देण्यात आला आहे. मागच्या एप्रिल महिन्यातच अमेरिकेच्या FDA ने व्हॅक्सिनच्या मंजुरीसाठी आणखी माहिती मागवली होती. त्यासंबंधीचे निर्देशही दिले होते. ते पूर्ण न झाल्याने संमती मिळाली नाही. एका वृत्तानुसार भारतातही कोरोनावरच्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा डेटा देण्यात अद्याप आलेला नाही. हा डेटा देण्याची मुदत जून महिन्यात संपते आहे. ANI दिलेल्या वृत्तानुसार जुलै महिन्यात तिसऱ्या टप्प्याचा डेटा दिला जाईल. तिसऱ्या टप्प्यातील अंतिम निष्कर्ष समोर आल्यानंतर कंपनी संपूर्णतः संमतीसाठी अर्ज करणार आहे. व्ही. के. पॉल यांना याबाबत विचारलं असता लसीचा डेटा 20 जूनलाच मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमेरिकेच्या FDA ने संमती दिली नसली तरीही तो त्यांचा निर्णय आहे. आपल्या देशात लसीकरणावर काहीही परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT