द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती; निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
राजकीय गणितांच्या आधारावर बांधल्या गेलेले अंदाज खरे ठरले. भाजपने उमेदवारी दिलेल्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. द्रौपदी मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाची वैशिष्ट्ये -राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवत देशातील सर्वोच्च […]
ADVERTISEMENT

राजकीय गणितांच्या आधारावर बांधल्या गेलेले अंदाज खरे ठरले. भाजपने उमेदवारी दिलेल्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. द्रौपदी मुर्मू यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाची वैशिष्ट्ये
-राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवत देशातील सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिल्या ठरल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीबद्दलचा शिंदेंचा दावा फोल; द्रौपदी मुर्मूंना महाराष्ट्रातून किती मतं मिळाली?
-राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. द्रौपदी मुर्मू यांना एकूण ५ लाख ७७ हजार ७७७ मते मिळाली. द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या आहेत.