Nashik Crime : दारुड्या मुलाकडून आईची सिमेंटच्या खांबावर डोकं आपटून हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दारु पिऊन उशीरा घरी परतलेल्या मुलाला घरात घेण्यास नकार दिल्यामुळे मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईने दार न उघडल्यामुळे संतापलेल्या मुलाने वाद घालत आईला धक्काबुक्की केली. ज्यात आईचं डोकं सिमेंटच्या खांबाला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा जिव गेल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील मेरी कॉलनी येथे विमल कचरु पवार आणि प्रशांत कचरु पवार हे दोघे मायलेक राहत होते. विमल पवार यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं, ज्यानंतर विमल पवार यांना पेन्शन मिळत होतं. प्रशांत पवारला दारुचं व्यवसन असून तो नेहमी दारु पिण्यासाठी पैसे दे यावरुन विमल यांच्याशी भांडण करायचा.

शुक्रवारी प्रशांत नेहमीप्रमाणे रात्री उशीरा दारुच्या नशेत घरी आला. यावेळी त्याने आईला घराचे दार उघडण्यासाठी बाहेरुन आवज दिला. यावेळी त्याच्या आईने आतूनच सांगितले की ‘खूप दारु पिऊन आला आहे, मी तुला घरात घेणार नाही’. यामुळे प्रशांतला आईचा राग अनावर झाला. काही वेळाने विमल पवार घराबाहेर येताच प्रशांतने त्यांच्याशी हुज्जत घातली.

हे वाचलं का?

नवजात बाळाला लोकल ट्रेनमध्ये सोडून देणाऱ्या महिलेसह प्रियकराला अटक

या वादावादीत प्रशांतने आपल्या आईला लोखंडी गेटजवळील सिमेटच्या खांबावर ढकललं. ज्यात विमल यांना जखम झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे दारुच्या नशेत असलेल्या प्रशांतला आपल्या आईला दुखापत झाल्याचं भानही नव्हतं. या वादावादीनंतर तो घरात येऊन झोपून गेला. सकाळी उठल्यावर आईची हालचाल होत नसल्याचं पाहून तो चांगलाच घाबरला. ज्यानंतर त्याने तात्काळ पोलीस ठाण्यात हजर होऊन सर्व प्रकार सांगितला. पंचवटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन मुलाला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

गावाने वेडं ठरवलं, परंतू त्याच्याच माहितीने पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हत्येतील आरोपीला केली अटक

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT