Vaccination in Mumbai : अपुऱ्या साठ्यामुळे उद्या सरकारी केंद्रांवर लसीकरण बंद
लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे उद्या (१ जुलै रोजी) मुंबई शहरात महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात लसीकरण बंद असणार आहे. मुंबई महापालिकेने याविषयी माहिती दिली आहे. १ जुलै रोजी सरकारी आणि महापालिका रुग्णालयातील लसीकरण हे अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद राहणार आहे. लसींचा होणारा पुरवठा पूर्ववत झाला की नागरिकांना याची माहिती देऊ तोपर्यंत नागरिकांनी सहकार्या करावं अशी विनंती महापालिकेने केली […]
ADVERTISEMENT
लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे उद्या (१ जुलै रोजी) मुंबई शहरात महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात लसीकरण बंद असणार आहे. मुंबई महापालिकेने याविषयी माहिती दिली आहे. १ जुलै रोजी सरकारी आणि महापालिका रुग्णालयातील लसीकरण हे अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद राहणार आहे.
ADVERTISEMENT
लसींचा होणारा पुरवठा पूर्ववत झाला की नागरिकांना याची माहिती देऊ तोपर्यंत नागरिकांनी सहकार्या करावं अशी विनंती महापालिकेने केली आहे. दरम्यान आजही शहरात लसीकरणाबद्दल सावळा गोंधळ पहायला मिळाला.
Covid Delta Variant: Sputnik-V लसीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती, डेल्टाविरुद्ध 90 टक्के प्रभावी
हे वाचलं का?
परदेशी शिक्षणासाठी बाहेरील देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीची वेगळी सोय करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यी आज दुसरा डोस घेण्यासाठी हजर होते, परंतू अपुऱ्या साठ्यामुळे त्यांना परतावं लागलं. “आम्ही आमच्या दूसऱ्या डोससाठी कूपर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिकडे तीन तास थांबल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की लसींचा साठा संपला आहे. आम्हाला पुन्हा सोमवारी यायला सांगितलं आहे. सोमवारी लसीचा पुरवठा होऊन आम्हाला दुसरा डोस मिळेल अशी आशा आहे”, विद्यार्थ्यांनी मुंबई तक शी बोलताना माहिती दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT