Shiv Sena: …तरीही दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, विनायक राऊतांनी क्लिअर सांगितलं
राकेश गुडेकर, प्रतिनिधी रत्नागिरी: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, शिंदे सरकारने काळी मांजरं सोडण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी हा मेळावा रोखण्याचं धाडस कोणीही करू नये, शिवतीर्थावरील मेळाव्याचा अधिकार शिवसेनेचाच आणि उद्धवजी ठाकरे यांचाच असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार विनायक राऊत काय म्हणाले? ”गद्दारांच्या गटाने […]
ADVERTISEMENT

राकेश गुडेकर, प्रतिनिधी
रत्नागिरी: शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, शिंदे सरकारने काळी मांजरं सोडण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी हा मेळावा रोखण्याचं धाडस कोणीही करू नये, शिवतीर्थावरील मेळाव्याचा अधिकार शिवसेनेचाच आणि उद्धवजी ठाकरे यांचाच असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
”गद्दारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात पलटी मारलेली आहे. चिन्ह गोठवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे, त्यामुळे औट घटकेचा त्यांचा खेळ संपत आलेला आहे. गद्दारांनी राजीनामे द्यावेत, आणि हिम्मत असेल तर विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्या, पण पळकुटेपणाचं धोरण या ईडी सरकारने अवलंबलं आहे अशी टीका विनायक राऊतांनी शिंदे गटावर केली आहे.
सदानंद चव्हाण सांगूनही ऐकले नाहीत- विनायक राऊत
शिंदे गटात गेलेल्या माजी आमदार सदानंद चव्हाण यांना जेवढं समजावून सांगता येईल तेवढं सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही… आता जिथे गेलात तिथे सुखासमाधानाने राहा असं म्हणत राऊत यांनी सदानंद चव्हाण यांच्यावर निशाणा साधला, तसेच ज्यांची हकालपट्टी झाली आहे अशांची नावं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत.