जगातील सर्वात महागडी कॉफी बनवतात ‘या’ प्राण्याच्या विष्ठेपासून…
जगभरात सर्वात आवडतं मानलं जाणारं पेय म्हणजे कॉफी आहे. भारतातही बरेच कॉफीप्रेमी आहेत. काहीजणांना कॉफीच्या वेगवेगळ्या चवी चाखण्याची आवड असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात महागडी कॉफी कोणती आणि ती कशापासून बनते? हे जाणून धक्का बसेल की, जगातील सर्वात महागडी कॉफी प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवली जाते. कोपी लुवाक असं या कॉफीचं नाव आहे. […]
ADVERTISEMENT

जगभरात सर्वात आवडतं मानलं जाणारं पेय म्हणजे कॉफी आहे.
भारतातही बरेच कॉफीप्रेमी आहेत. काहीजणांना कॉफीच्या वेगवेगळ्या चवी चाखण्याची आवड असते.
पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात महागडी कॉफी कोणती आणि ती कशापासून बनते?
हे जाणून धक्का बसेल की, जगातील सर्वात महागडी कॉफी प्राण्यांच्या विष्ठेपासून बनवली जाते.
कोपी लुवाक असं या कॉफीचं नाव आहे. जर या कॉफीची चव चाखायची असेल तर, एका कपसाठी 6,000 रुपये मोजावे लागतील.
ही खास कॉफी ‘एशियन सिव्हेट वीसेल’ नावाच्या प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते.
सिव्हेट ही विझल मांजराची एक प्रजाती आहे परंतु तिला माकडासारखी लांब शेपटी असते.
त्यांना कॉफी बीन्स खायला आवडतात पण ते त्याचे बिया पचवू शकत नाहीत यामुळे ते विष्ठेद्वारे बाहेर टाकतात.
या विष्ठेतून येणाऱ्या बियांपासूनच ही महागडी कॉफी बनते.