‘त्या’ पत्रावर Fadnavis म्हणाले, ठाकरेंचा इगो मोठा म्हणून..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Devendra Fadnavis Said Thackerays ego was big: पुणे: महाराष्ट्राचे (Maharashtra) माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत महाविकास आघाडीने (MVA) 12 आमदारांची एक यादी दिली होती त्यावर सही का केली नाही याबाबत एक मोठा दावा केला होता. आता त्यांचा हाच दावा उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खरा असल्याचं म्हटलं आहे. (on the letter given by mva to governor koshyari regarding appointment of 12 mlas devendra fadnavis said that thackerays ego was big)

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सत्तेत असताना विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त 12 जागांसाठी नावं पाठविण्यात आली होती. पण राज्यपाल पदावरुन पायउतार होईपर्यंत भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshayri) यांनी त्या फाइलवर सहीच केली नाही. याबाबत कोश्यारी म्हणाले की, महाविकास आघाडीने धमकी देणारं पत्र लिहलं होतं त्यामुळेच आपण त्याच्यावर सही केली नाही.

फडणवीसांनीही दिला कोश्यारींच्या म्हणण्याला दुजोरा..

याचविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की, ‘राज्यपालांना लिहलेलं पत्र हे अजित पवार नाही तर उद्धव ठाकरेंनी लिहलं होतं. आता मी काही पूर्ण मुलाखत पाहिली नाही. पण थोड्या बातम्या पाहिल्या आहे. पण कोश्यारींनी सांगितलेल्या गोष्टी या खऱ्या आहेत.’

हे वाचलं का?

‘मला जी माहिती आहे त्यानुसार.. ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते नंतर राज्यापालांना भेटायला गेले होते तेव्हा राज्यपालांनी त्यांना सांगितलं होतं की, अशाप्रकारच्या धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच सही करत नाही. योग्य फॉर्मेटमध्ये तुम्ही पत्र पाठवा. पण मविआचा देखील इगो होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही बदलणार नाही.’ असं फडणवीस म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरेंचं पत्र कोश्यारींच्या जिव्हारी! सांगितलं 12 आमदारांच्या फाईलचं सत्य

ADVERTISEMENT

फडणवीसांची उद्धव ठाकरेंवरही टीका

याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली. ‘राजकारणात माणूस कधी वर जातो कधी खाली जातो.. पण इतकं निराश होऊन.. मनात येईल ते बोलायचं यातून लोकं त्यांच्या बुद्धीची कीव करतात. त्यांच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही. निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ. आणि जोवर उद्धवजींचा सवाल आहे… तर त्यांच्याकडे मर्यादित शब्दसंपदा आहे. 10-20 शब्द आहेत. ते शब्द फिरवून फिरवून वापरतात.’ अशा शब्दात फडणवीसांनी हेटाळणी केली.

ADVERTISEMENT

Exclusive: ‘उद्धव ठाकरे संत माणूस, पण शकुनी मामाच्या..’, कोश्यारींचा पवारांवर वार?

मुंबई Tak च्या मुलाखतीत कोश्यारी काय म्हणालेले?

प्रश्न – जोपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, तोपर्यंत तुमची भूमिका वेगळीच होती. म्हणजे विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती करणं. तुम्ही त्या फाईलवर शेवटपर्यंत स्वाक्षरी केली नाही. स्वाक्षरी न करण्याचं कारणही तुम्ही सांगितलं नाही.

भगतसिंह कोश्यारी- बघा. त्यांची (महाविकास आघाडी) शिष्टमंडळ येत राहिली. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही आधी हे पत्र बघा. पाच पानांचं पत्र आहे. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात गेलं. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत आहात. कायदे सांगत आहात. आणि शेवटी लिहिता की, 15 दिवसांत मंजूर करा. कुठे लिहिलंय की, मुख्यमंत्री राज्यपालांना सांगू शकतो की मला इतक्या दिवसांच्या आत मंजूर करून पाठवा. संविधानात कुठे लिहिलं आहे? ते जेव्हा समोर येईल, तेव्हा तुम्हाला कळेल की सत्य काय आहे. तसं पत्र पाठवलं नसतं, तर मी पुढच्याच दिवशी त्यावर सही करणार होतो. तुम्ही असली पत्र लिहिता.

प्रश्न – तुमचे संबंध चांगले असते, तर अशा प्रकारचं पत्र पाठवलं गेलं नसतं.

भगतसिंह कोश्यारी – माझे संबंध खूप चांगले होते, पण त्यांचे (उद्धव ठाकरे) सल्लागार कोण होते? त्यांचे हेच सगळे आमदार येऊन मला सांगत होते की, साहेब तुम्ही आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे तर शकुनी मामाच्या जाळ्यात अडकले. माहिती नाही, त्यांचा कोण शकुनी मामा होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT