शिवसेनेच्या आणखी सहा नेत्यांचे घोटाळे समोर येणार; सोमय्यांकडून ठाकरेंची कोंडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावे असलेल्या कंपनीचा उल्लेख करत सोमय्यांनी शिवसेनेच्या ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले, “माझा प्रश्न आहे की, निलांबरी प्रोजेक्ट ठाणे, श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि., श्रीधर माधवराव पाटणकर ऊर्फ उद्धव ठाकरे यांचे मेहुणे म्हणजेच रश्मी उद्धव ठाकरे यांचे भाऊ. पुष्पक बुलियन, महेश पटेल, चंद्रकांत पटेल, पुष्पक रिअॅलिटी डेव्हलपर्स, नंदकिशोर चतुर्वेदी म्हणजे हवाला डीलर… उदाहरण म्हणून मी एका शेल कंपनीचं नाव दिलं आहे.”

नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना गर्भित इशारा; नितेश राणेंनी दिला इतिहासाचा दाखला

हे वाचलं का?

“आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी २०१४ मध्ये जी ही कंपनी बनवली होती. आदित्य ठाकरे या कंपनीत संचालक, मालक आणि ५० टक्के त्यांचा हिस्सा, तर ५० हिस्सा रश्मी उद्धव ठाकरे यांचा. आता या कंपनीची काय अवस्था आहे. ही कंपनी आता नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. हा नंदकिशोर चतुर्वेदी हवाला ऑपरेटर आहे. ३० कोटींच्या व्यवहारात हेच महाशय सहभागी आहेत,” अशी सोमय्या म्हणाले.

“ठाकरे कुटुंबाने जी कंपनी बनवली होती, ती कंपनी नंदकिशोरला कशी दिली गेली. का गेली. अन्वय नाईकचा घोटाळा मी बाहेर काढल्यानंतर माफिया सेनेचे १२ नेते अंगावर आले होते. तीन वेळा हल्ले केले. ते आता पाच मिनिटानंतर हल्ला सुरू करणार. नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर आहे. ठाकरे कुटुंबाने स्वतः स्थापन केलेली कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीकडे का दिली, केव्हा दिली, कशी दिली? हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध काय?”, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय?; सोमय्यांचा नवा सवाल

ADVERTISEMENT

“ठाकरे कुटुंबाचा हा पहिलाच मनी लॉंडरिंग व्यवहार आहे का? मी आता ठाकरे परिवाराला प्रश्न विचारतोय? तुम्ही (उद्धव ठाकरे) याआधी कधी मनी लॉडरिंग केलं आहे का? तुमच्या कुटुंबाने, श्रीधर पाटणकर यांनी, त्याचबरोबर श्रीधर पाटणकर यांनी मनी लॉंडरिंग करून ते पैसे ठाकरे कुटुंबाच्या खात्यात जमा केले आहे का? यासंबंधी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे.”

ADVERTISEMENT

“हे फक्त नोटबंदी संबंधीचे विषय नाहीत. हा विषय आहे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून पैसे घेण्याचा. गेली दोन वर्षे महाराष्ट्राचं सरकार पोलिसांचा माफियासारखा उपयोग करून पैसे जमवत आहे. ते पैसे कंपनीत जमा करत आहेत. कालच प्रकरण फक्त सुरुवात आहे. पुढच्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेच्या ६ लोकांचे घोटाळे समोर येतील. महाराष्ट्राला घोटाळ्यातून मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे”, असा इशारा सोमय्यांनी दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT