साई रिसॉर्टसह अनिल परबांच्या 10कोटींच्या संपत्तीवर ED ची टाच

दिव्येश सिंह

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांच्या ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीये. दापोलीतील साई रिसॉर्टसह अनिल परबांची 10.20 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये मुरूड, दापोली, रत्नागिरीतील गट क्रमांक 446 मधील अंदाजे 52 गुंठे जमीन जप्त केली आहे. या जमिनीची किंमत 2,73,91,000 रुपये आहे. साई रिसॉर्ट उभारण्यात आलेली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांच्या ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आलीये. दापोलीतील साई रिसॉर्टसह अनिल परबांची 10.20 कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

ईडीने जप्त केलेल्या संपत्तीमध्ये मुरूड, दापोली, रत्नागिरीतील गट क्रमांक 446 मधील अंदाजे 52 गुंठे जमीन जप्त केली आहे. या जमिनीची किंमत 2,73,91,000 रुपये आहे. साई रिसॉर्ट उभारण्यात आलेली जमीन ज्याची किंमत 7,46,47,000 रुपये इतकी आहे.

अनिल परब मनी लॉड्रिंग प्रकरण काय आहे?

अनिल परब यांचं रिसॉर्ट मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर होतं, त्याचा तपासही ईडीकडून करण्यात आला होता. याच रिसोर्टच्या आधारे ईडीने छापेमारी केली आहे, तसंच चौकशीही सुरू करण्यात आली होती. याआधी ८ मार्चला आयकर विभागाने मुंबईतल्या एका केबल ऑपरेटवरवर तसंच वाहतूक विभागातील एक कर्मचारी आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांवर शोध मोहीम राबवली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp