अनिल परब यांना ED ची नोटीस; संजय राऊतांचं ट्विट म्हणाले, ‘शाब्बास’
नारायण राणे अटक व जामीन नाट्यावर पडदा पडलेला असतानाच आता नवा वाद उभा राहिला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची आज सांगता झाली. यात्रेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट […]
ADVERTISEMENT

नारायण राणे अटक व जामीन नाट्यावर पडदा पडलेला असतानाच आता नवा वाद उभा राहिला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची आज सांगता झाली. यात्रेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत संजय राऊत यांनी ट्विट करून अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली असल्याची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
‘शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजिये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू… जय महाराष्ट्र’, असं राऊत यांनी म्हटलं आहे.