Money Laundering : अनिल देशमुख यांच्या पत्नीला ED चं समन्स

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Money Laundering प्रकरणी आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीने समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती यांची याबाबत चौकशी केली जाणार आहे. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश गुमरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी आरती देशमुख यांना समन्स बजावण्यात आलं. त्यांना गुरूवारी ईडी कार्यालयात बोलवण्यात आलं आहे तिथे त्यांची चौकशी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. याआधी हृशिकेश देशमुखला समन्स बजावण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

आम्ही ईडीला सांगितलं आहे की आरती देशमुख यांचा मनी लाँड्रीग प्रकरणाशी काही संबंध नाही. मात्र तरीही ईडीने आरती देशमुख यांना समन्स बजावलं आहे. ईडीचं हे संपूर्ण प्रकरण सचिन वाझेने दिलेल्या कबुली जबाबावर आधारीत आहे. माजी एपीआय सचिन वाझेला अटक कऱण्यात आली आहे. सचिन वाझेने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. मात्र सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांना दिलेला जबाब वेगळा आहे. त्यामुळे स्पष्ट झालं आहे की कोणतेही पैसे किंवा कशाचीही देवाणघेवाण झालेली नाही. अनिल देशमुख यांनाही पैसे देण्यात आले नाहीत, तसंच पीए कुंदन शिंदे यांनाही नाहीत. असंही गुमरे यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांना असं वाटतं आहे 100 कोटींच्या वसुली प्रकरणी जे आरोप झाले आहेत आणि त्याची जी काही चौकशी सुरू आहे ती न्याय्य नाही. त्यामुळे ते या तपासासाठी हजर राहिलेले नाहीत. प्रकरणाचा तपास हा फक्त आरोपांवर आधारित आहे. तसंच आम्ही जी काही कागदपत्रं मागितली जात आहेत ती वेळोवेळी पुरवत आहोत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाही इतक्या काही महिन्यांमध्ये परमबीर सिंग गप्प का असं कोर्टानेही विचारलं आहे असंही गुमरे यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

सचिन वाझेच्या आरोपांचं काय असं विचारलं असता गुमरे म्हणाले की सचिन वाझेचा बॉस कोण होतं हे सगळ्यांना माहित आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची भेट फक्त एकदा झाली आहे. एवढंच नाही तर सचिन वाझेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कुठेही असं म्हटलेलं नाही की त्याने अनिल देशमुख यांना दिले. त्यामुळे आरोपांना काही अर्थ नाही असंही गुमरे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT