नवाब मलिकांचं तोंड बंद करण्यासाठीच ईडीची कारवाई, छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप

मुंबई तक

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून आज अटक करण्यात आली. ज्या पद्धतीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली त्याचा महाविकासआघाडी गुरूवारी निषेध करणार आहे. गुरूवारी सकाळी 10 वाजता महाविकासआघाडीचे नेते मुंबईत आंदोलन करणार आहे. तर परवापासून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच महाविकास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून आज अटक करण्यात आली. ज्या पद्धतीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली त्याचा महाविकासआघाडी गुरूवारी निषेध करणार आहे. गुरूवारी सकाळी 10 वाजता महाविकासआघाडीचे नेते मुंबईत आंदोलन करणार आहे. तर परवापासून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करत महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा विरोधी पक्षाचा डाव असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

नवाब मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई

छगन भुजबळ म्हणाले, नवाब मलिक हे विरोधकांविरुद्ध बोलतात म्हणून 30 वर्षापूर्वीच्या प्रकरणात मलिकांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. मंत्र्याचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. नवाब मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करत या पद्धतीने कारवाई करणे हे लोकशाहीला शोभा न देणारे हे वागणे आहे. ज्या वेळी हे प्रकरण घडले त्यावेळी पीएमलए कायदा अस्तित्वात नव्हता असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

आणखी काय म्हणले छगन भुजबळ?

हे वाचलं का?

    follow whatsapp